शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
3
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
4
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
5
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
6
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
7
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
8
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
9
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
10
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
11
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
12
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
13
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
15
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
16
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
17
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
18
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
19
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
20
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!

कोरोना व्हायरसबरोबरच्या युद्धातील 'ढाल' आहे हा 'सूट', आता बनला पुतीन यांचे 'संरक्षण कवच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 16:43 IST

इबोला असो अथवा कोरोना, जेव्हा-जव्हा जगात व्हायरसचा हल्ला होतो, तेव्हा-तेव्हा हा हजमत सूट डॉक्टर, नर्सेस आणि गरजवंतांसाठी 'संरक्षण कवच' बनतो.

ठळक मुद्देअमेरिकेसह जगातील तब्बल194 देश कोरोना व्हायरसच्या विळख्यात व्लादिमीर पुतीन यांनी रुग्णालयात जाऊन केली रुग्णांची पाहणीयावेळी पुतीन यांनी परिधान केलेला सूट डॉक्‍टरांसाठीही आहे 'संरक्षण कवच'

मॉस्को - संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. सुपर पावर म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिकेसह जगातील तब्बल194 देश कोरोना व्हायरसच्या विळख्यात आडकले आहेत. या महामारीमुळे आतापर्यंत जगात तब्बल 18,906 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4,23,142 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबरोबरच्या या लढाईत संपूर्ण जग, अशा एका 'ढाली'चा वापर करत आहे, जी कोरोनासाठी अभेद्य आहे. या ढालीचे नाव आहे 'हजमत सूट'. जाणून घेऊया काय आहे यात खास?

डॉक्‍टरांसाठी 'संरक्षण कवच' आहे हा सूट -इबोला असो अथवा कोरोना, जेव्हा-जव्हा जगात व्हायरसचा हल्ला होतो, तेव्हा-तेव्हा हा हजमत सूट डॉक्टर, नर्सेस आणि गरजवंतांसाठी 'संरक्षण कवच' बनतो. यामुळे डॉक्‍टर आणि नर्सेसना किलर व्हायरसपासून स्वतःचा बचाव करत रुग्णांवर उपचार करणे सहज शक्य होते. रशियाचे राष्‍ट्रपती व्लादिमीर पुत‍ीन यांनी हजमत सूट परिधान करून कोरोना पीडितांची पाहणी केली.

यामुळे या सूटला म्हणले जाते 'हजमत सूट' -'हजमत सूट' हे हेजार्डस मटेरियल सूटचे संक्षिप्‍त नाव आहे. या सूटने संपूर्ण शरीर झाकता येते. हा सूट घातक पदार्थ, रसायने आणि जैविक धोकादायक गोष्टींपासून परिधान करणाऱ्या व्यक्तीचे संरक्षण करतो. हा सूट पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंटचेच (PPE) एक रूप आहे. हा सूट डॉक्‍टर मंडळी रुग्णांवर उपचार करतानाच परिधान करतात. या सोबत चश्‍मा, ग्‍लोज आणि गाऊन परिधान केला जातो.

हा सूट ​कोरोनासाठी अभेद्य आहे -हजमत सूट परिधान करण्याचे जगभरात वेगवेगळे प्रोटोकॉल आहेत. यावेळी व्हायरस अथवा एखादा आजार पसरूनये याचीही काळजी घेतली जाते. हा सूट तयार करताना कुठलाही व्हायरस अथवा धोकादायक पदार्थ यात शिरकाव करणार नाही, याची काळजी घेतली जाते. यापूर्वी इबोला संक्रमणाच्या वेळीही हा सूट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले होते. 

अत्यंत विशेष असतो हा सूट -हजमत सूटच्याकाही लेवल असतात. जसे, की ए, बी, सी अधवा डी. धोका कशा प्रकारचा आहे, या आधारावर हा सूट परिधान केला जातो. 'ए' लेवलचा हजमत सूट सर्वोधिक धोका असताना परिधान केला जातो. हा सूट परिधान केला, की विषारी पदार्थ, गॅस आदींपासून संरक्षण होते. यात ऑ‍क्‍सीजनसाठीही स्वतंत्र व्यवस्था असते. आणि दोन बाजूंनी रेडिओ लावलेला आसतो. हा रेडिओ आतून घातला जातो. लेवल 'बी' सूट उडणारे पदार्थ अथवा रसायनांपासून संरक्षण करतो. हा सूट एअर टाइट नसतो. कमी धोका असताना याचा वापर केला जातो. 

जाणून घ्या या सूटची किंमत - हजमत सूट आणि सर्व पीपीई परिधान कराण्यासाठी जवळपास अर्थातास लागतो. हा सूट मानसांच्या कपड्यांवरूनच परिधान करावा लागतो. यानंतर ग्लोज स्लिव्हज, शूज आणि मास्‍क घातले जाते. हा सूट परिधान करताना कुठलीही बाजू खुली राहणार नाही याची दक्षता घेतली जाते. इबोला आणि कोरोनासारख्या व्हायरसच्या प्रसारावेळी हा सूट केवळ परिधान करणेच आवश्यक नाही, तर तो सुरक्षितपणे काढणेही तेवढेच आवश्यक आहे. भारतात एका हजमत सूटची किंमत जवळपास 2500 रुपये एवढी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याVladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाMosqueमशिद