शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मंगोलियाला शस्त्रे देण्याची रशियाची घोषणा, चीनचा पारा चढला; अटकेच्या आदेशानंतरही पुतिन यांना 'गार्ड ऑफ ऑनर'! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 15:01 IST

Vladimir Putin Mongolia Visit : रशिया शस्त्रास्त्रांपासून लष्करी प्रशिक्षणापर्यंत सर्व काही मंगोलियाला पुरवेल, अशी घोषणा व्लादिमीर पुतिन यांनी केली आहे.

Vladimir Putin Mongolia Visit : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी मंगोलियाला भेट दिली. व्लादिमीर पुतिन यांच्या मंगोलिया दौऱ्याची खूप चर्चा होत आहे, कारण आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) व्लादिमीर पुतिन यांना अटक करण्याचे आदेश मंगोलियन सरकारला दिले होते. मात्र, मंगोलियात व्लादिमीर पुतिन यांना गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले. यावेळी व्लादिमीर पुतिन यांनी चीनलाही धक्का दिला आहे. रशिया शस्त्रास्त्रांपासून लष्करी प्रशिक्षणापर्यंत सर्व काही मंगोलियाला पुरवेल, अशी घोषणा व्लादिमीर पुतिन यांनी केली आहे.

व्लादिमीर पुतिन यांच्या घोषणेनंतर चीनचा पारा चढला आहे. कारण भारताप्रमाणेच चीनचाही मंगोलियासोबत सीमावाद आहे. यावरून अनेक वादही झाले आहेत. व्लादिमीर पुतिन यांच्या घोषणेबाबत रशियाचे उप संरक्षण मंत्री अलेक्झांडर यांनी सांगितले की, मंगोलियाला शस्त्रे आणि लष्करी उपकरणे पुरवली जातील. याशिवाय, दुरुस्तीसह इतर बाबींमध्येही मदत केली जाणार आहे. तसेच, आतापर्यंत ३४० सैनिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे अलेक्झांडर यांनी सांगितले,

मंगोलियाच्या दौऱ्यादरम्यान व्लादिमीर पुतिन यांनी मंगोलियाचे अध्यक्ष उखनागिन खुरेलसुख यांच्याशीही अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. व्लादिमीर पुतिन म्हणाले की, मंगोलिया आणि रशियामधील संबंध प्रगतीपथावर आहेत. रशिया आणि मंगोलिया दहशतवादविरोधी कारवायांमध्येही सहकार्य करत आहेत. तसेच, व्लादिमीर पुतिन यांनी मंगोलियाला गॅस क्षेत्रातही मदत देऊ केली. दरम्यान, रशिया मंगोलियाला मोठ्या प्रमाणावर गॅस आणि वीज पुरवतो.

व्लादिमीर पुतिन यांना अटक करण्याचे दिले होते आदेश गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्यावर युद्ध गुन्ह्यांचा आरोप होता. युक्रेनमधून बेकायदेशीरपणे मुलांना रशियात पाठवल्याबद्दल न्यायालयाने व्लादिमीर पुतिन यांना जबाबदार धरले होते. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने हल्ला केला, तेव्हा युक्रेनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, मंगोलिया हा आयसीसीचा सदस्य देश आहे, परंतु असे असूनही मंगोलियाने आयसीसीचा आदेश पाळला नाही. 

टॅग्स :russiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनInternationalआंतरराष्ट्रीयchinaचीन