शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांच्या थव्याला धडकल्यानं विमानाचं इंजिन फेल, 233 प्रवासी थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 17:49 IST

रशियातलं एक विमान दुर्घटनाग्रस्त होता होता थोडक्यात बचावलं आहे.

मॉस्कोः रशियातलं एक विमान दुर्घटनाग्रस्त होता होता थोडक्यात बचावलं आहे. मॉस्कोच्या विमानतळावरून उड्डाण घेतलेलं विमान शहरापासून काही अंतर दूर गेल्यानंतर एका पक्ष्यांच्या थव्याला धडकलं. अशा परिस्थितीत विमानाला पुढे नेणं धोक्याचं असल्याचं लक्षात आल्यावर वैमानिकानं त्या विमानाचं तात्काळ लँडिंग केलं. त्या विमानाच्या वैमानिकानं एका मक्याच्या शेतातच ते विमान उतरवलं आणि 233 प्रवासी अपघातग्रस्त होता होता थोडक्यात बचावले.वैमानिकानं प्रसंगावधान दाखवल्यानं 233 प्रवाशांचा जीव वाचला आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, या इमर्जन्सी लँडिंगमध्ये 23 प्रवासी जखमी झाले आहेत. परंतु इतर कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यूराल एअरलाइन्सचं विमान एअरबस 321नं मॉस्कोहून उड्डाण भरलं होतं. शहरातल्या दक्षिण पूर्व भागात विमान पोहोचताच त्याचं एका शेतात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. विमानाच्या इंजिनमध्ये अनेक पक्षी अडकल्याची भीती सतावत असल्यानं ते पुढे नेणं धोक्याचं होतं. म्हणूनच वैमानिकानं तात्काळ त्या विमानाचं लँडिंग केलं.रशियातल्या झुकोवस्की या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानानं उड्डाण केल्यानंतर ते फक्त एक किलोमीटरपर्यंत दूर गेलं होतं आणि त्याचदरम्यान त्याला खाली उतरवावं लागलं आहे. रशियाच्या सरकारी वृत्तवाहिनी हा चमत्कार असल्याचं सांगितलं आहे. पायलटनं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे जवळपास 233 प्रवाशांचा जीव बचावला आहे.