शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून त्याने घराखाली उभ्या असलेल्या 5 लोकांची गोळ्या झाडून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 10:22 IST

कोरोना व्हायरसमुळे अनेकांना आपला जीव गमावावा लागत आहे. अशात ही धक्कादायक घटना घडल्याने लोक हैराण झाले आहेत.

जगभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरूच आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकांनी स्वत:ला घरात बंद करून घेतलंय. अशात रशियात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने 5 लोकांवर गोळी झाडून त्यांची हत्या केली. हत्या कारण वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे पाचही लोक आरोपीच्या घराखाली जोरजोरात गप्पा करत होते म्हणून त्याने या पाच जणांवर गोळ्या झाडल्या.

रशियाची राजधानी रिजाय मॉस्कोपासून 200 किलोमीटर दूर येल्तमामध्ये ही घटना घडली असून सगळीकडे या घटनेची चर्चा रंगली आहे. घटनेनंतर प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 10 वाजता 5 लोक एका घराखाली आपापसात जोरजोरात गप्पा करत होते. त्यांचा आवाज ऐकून आरोपीने बाल्कनीत त्या लोकांना कमी आवाज करण्याची विनंती केली. 

दरम्यान, आरोपी आणि खाली असलेल्या लोकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपी घरातील रायफल आणून थेट पाचही लोकांवर गोळ्या झाडल्या. फायरिंगनंतर पाचही व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. मारल्या गेलेल्या पाच लोकांमध्ये 4 पुरूष आणि एक महिला होती.

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या व्यक्तीचं वय 32 वर्षे असल्याची माहिती आहे. पोलिसांनी आरोपीचं नाव जाहीर करण्यास नकार दिलाय. त्याच्याकडून रायफलही जप्त करण्यात आली आहे. 

दरम्यान, जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. अनेकांना जीव कोरोनामुळे जात आहे. अशात रशियात या घटनेने एकच गोंधळ उडाला आहे. रशियात कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने लोकांना घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत. पण काही लोक बाहेर फिरत आहेत.

रशियामध्ये आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या 5389 केसेस समोर आल्या आहेत. तर 45 लोकांचा मृत्यू झाला आहे. इथे जास्तीत जास्त लागण ही राजधानी मॉस्कोत समोर आली आहे. आता तर रशियात अनेक ऑफिसेस बंद करण्यात आली आहेत. 

टॅग्स :russiaरशियाCrime Newsगुन्हेगारी