शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

रशियन सैन्याच्या कुत्र्याने मारली ‘पलटी’, युक्रेनच्या सैनिकांची करतोय मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 06:21 IST

रशियाच्या सैनिकांनी काळ्या समुद्राजवळील मायकोलिव्ह प्रदेशातील एक गाव काबीज केले तेव्हा मॅक्स त्यांच्या सैन्यासोबत होता

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये रशियन सैन्याचा एक कुत्रा आता रशियाच्याच विरोधात युक्रेनच्या सैन्याला मदत करतोय. युक्रेनचे सैन्य त्या कुत्र्याचा वापर रशियाविरुद्धच करत आहेत. मॅक्स असे या ‘बेल्जियन मालिनॉइस’ जातीच्या कुत्र्याचे नाव असून तो ३ वर्षांचा आहे. खरं तर युक्रेनच्या एका गावातून माघार घेत असताना रशियन सैन्य मॅक्सला तिथेच सोडून गेले.

रशियाच्या सैनिकांनी काळ्या समुद्राजवळील मायकोलिव्ह प्रदेशातील एक गाव काबीज केले तेव्हा मॅक्स त्यांच्या सैन्यासोबत होता. एकटा राहिल्यामुळे मॅक्सची प्रकृती खालावली आणि तो आजारी पडला. कुजलेले अन्न खाऊन तो कसाबासा जिवंत राहिला. दरम्यान, जेव्हा युक्रेनियन सैनिक गावात परतले तेव्हा त्यांनी मॅक्सला पाहिले आणि तो रशियन सैन्याच कुत्रा असल्याचेही ओळखले. युक्रेनियन सैनिकांनी मॅक्सची खूप काळजी घेतली. त्याला चांगले जेवण आणि औषधे दिली. रुग्णालयातही घेऊन गेले व त्याच्यावर उपचार केले. यानंतर युक्रेनियन सैन्याने मॅक्सला त्यांच्या आदेशाचे पालन करण्याचे प्रशिक्षण दिले. आता मॅक्स पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि तो युक्रेनियन सैनिकांच्याच आज्ञा ऐकतो. 

रशियन लोकांनी मॅक्ससारख्या प्राण्याला वाऱ्यावर सोडल्याचे मला खूप आश्चर्य वाटतेय. असे ब्रिटिश विशेष दलातील एक सैनिक म्हणाला. कुत्र्याच्या या जातीचा वापर एसएएस आणि एसबीएसद्वारेही केला जातो. ते शूर, अत्यंत हुशार आणि ऍथलेटिक असतात. ते कमालीचे निष्ठावान देखील असतात, पण युक्रेनियन आता आपले नवीन मालक आहेत याची मॅक्सला खात्री पटली आहे. 

‘रशियन सैनिकांनी इतक्या गोंडस प्राण्याला का मागे सोडले हेच आम्हाला समजत नाहीये. मॅक्स आमच्या सैनिकांचा खूपच आवडता बनलाय. आता मॅक्स युक्रेनचे रक्षण करतोय,’ असे युक्रेनियन नॅशनल गार्डचे सदस्य दिमित्री म्हणाले. 

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाdogकुत्रा