शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

Russia vs Ukraine War: रशियावर दबावासाठी बायडेन युरोपात दाखल; पाश्चिमात्य देश आणखी निर्बंध लादण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 06:30 IST

बायडेन हे जी-सात गटातील देशांच्या बैठकीतही युक्रेनसंदर्भात सविस्तर चर्चा करणार आहेत. युक्रेन युद्धाचा जगावर गंभीर परिणाम होणार असल्याचा दावा पाश्चिमात्य देशांनी केला आहे.

ब्रुसेल्स : युक्रेनविरोधातील युद्ध रशियाने थांबवावे यासाठी दबाव वाढविण्याकरिता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे युरोपमध्ये दाखल झाले असून गुरुवारी नाटो देशांच्या बैठकीत ते सहभागी झाले. अमेरिका व अन्य पाश्चिमात्य देशांनी याआधीच रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. मात्र युरोपच्या दौऱ्यात बायडेन यांनी रशियाविरोधात अधिक कडक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा अमेरिकी जनतेेनेही व्यक्त केली आहे.बायडेन हे जी-सात गटातील देशांच्या बैठकीतही युक्रेनसंदर्भात सविस्तर चर्चा करणार आहेत. युक्रेन युद्धाचा जगावर गंभीर परिणाम होणार असल्याचा दावा पाश्चिमात्य देशांनी केला आहे.रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे युद्ध थांबविण्यास तयार नाहीत. नाटोमध्ये सामील होणार नाही, असे युक्रेनने मान्य केल्यास युद्ध थांबविण्याचा विचार करता येईल, असे रशियाने काही दिवसांपूर्वी म्हटले होते. मात्र युक्रेनने त्याला अद्याप होकार दिलेला नाही. बायडेन युरोप दौऱ्यात पोलंडलाही भेट देणार   आहेत. युरोपीय समुदायाच्या २७ सदस्य देशांच्या प्रतिनिधींबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची एक बैठक होणार आहे. रशियाला चहूबाजूंनी कोंडीत पकडण्यासाठीच या सर्व बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.  रशियाच्या बँकेवर अमेरिकेचे निर्बंधरशियाच्या सेंट्रल बँकेने आर्थिक व्यवहार करताना सोन्याचा वापर करण्यावर जी-७ गटातील देशांनी निर्बंध लादले आहेत. रशियाच्या लोकप्रतिनिधीगृहातील ३२८ सदस्य, त्या देशातील श्रीमंत व्यक्ती व सरकारी मालकीच्या ४८ संरक्षण उत्पादन कंपन्यांवर अमेरिकेने याआधीच निर्बंध लागू केले होते.बायडेन यांनी अधिक कठोर भूमिका घ्यावीरशियाविरोधात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अधिक कठोर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा अमेरिकेच्या जनतेने व्यक्त केली आहे. यासंदर्भातील एका जनमत चाचणीतून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी केलेली आवाहने रशियाने धुडकावून लावली होती. त्यानंतर या देशांनी रशियावर काही निर्बंध लादूनही पुतिन आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनJoe Bidenज्यो बायडन