शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Russia vs Ukraine War: अणुप्रकल्पातील नवी प्रयोगशाळा रशियाने केली नष्ट; किरणोत्सर्गाचे प्रमाण मोजणारी यंत्रणाही बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 08:14 IST

प्रकल्पातील किरणोत्सर्गाचे प्रमाण मोजणारी यंत्रणाही बंद पडल्याचे युक्रेनने म्हटले आहे.

लविव्ह : युक्रेनमधील चेर्नोबिल अणुप्रकल्पात उभारण्यात आलेली नवी प्रयोगशाळा रशियाच्या लष्कराने हल्ले करून नष्ट केली. अणुकचऱ्याच्या विल्हेवाटीचे व्यवस्थापन सुधारण्याकरिता ही प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली होती. या प्रकल्पातील किरणोत्सर्गाचे प्रमाण मोजणारी यंत्रणाही बंद पडल्याचे युक्रेनने म्हटले आहे.युक्रेन युद्धाच्या २७ व्या दिवशी ही घटना घडली आहे. या युद्धाच्या सुरुवातीलाच रशियाने चेर्नोबिल अणु प्रकल्पावर कब्जा केला होता. या प्रकल्पातील कामकाज सध्या बंद ठेवण्यात आले आहे. १९८६ साली चेर्नोबिल अणुप्रकल्पात मोठा अपघात होऊन किरणोत्सर्ग झाला होता. या प्रकल्पात युरोपीय समुदायाच्या सहकार्याने युक्रेनने ५० कोटी रुपये खर्चून ही नवी प्रयोगशाळा २०१५ साली उभारली होती. या प्रयोगशाळेत असलेले सर्व किरणोत्सारी पदार्थ व नमुने आता रशियाच्या ताब्यात गेले आहेत. ते या गोष्टींचा गैरवापर करणार नाही, अशी आशा असल्याची प्रतिक्रिया युक्रेनने व्यक्त केली. किरणोत्सर्गाचे प्रमाण किती आहे, हे मोजणारी अणुप्रकल्पातील यंत्रणा बंद पडल्याचे युक्रेनने म्हटले आहे.रशियावर नवे निर्बंध लादण्याचा विचार?रशियावर आणखी निर्बंध लादण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा विचार आहे. या आठवड्यातील युरोपच्या दौऱ्यात बायडेन युक्रेन युद्धासंदर्भातील मुद्द्यांवर काही देशांच्या नेत्यांशी चर्चा करतील. बायडेन बुधवारी चार दिवसांच्या युरोप दौऱ्यावर रवाना झाले. रशियाने आक्रमण केल्यास युक्रेनमधील लक्षावधी नागरिकांनी पोलंडसह शेजारी देशांमध्ये आश्रय घेतला आहे. बायडेन पोलंडलाही जाणार आहेत. मदतपथकातील १५ जणांना ताब्यात घेतलेयुद्धामुळे मारियुपोल शहरातील अत्यंत हालाखीत जगत असलेल्या लोकांना अन्नपाण्याचा पुरवठा करणाऱ्या मदतपथकातील १५ जणांना रशियाने ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप युक्रेनने केला आहे. मारियुपोलवर रशियाचे हवाई दल, नौदल हल्ले करत आहे. त्या शहरात सुमारे १ लाख लोक अडकून पडल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी केला होता.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया