शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

Russia vs Ukraine War: ट्रम्प म्हणतात, अमेरिकेनं आपल्या विमानांवर चिनी ध्वज लावून रशियावर बॉम्ब टाकावेत अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 2:51 PM

Russia vs Ukraine War: रशियाला धडा शिकवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब सल्ला

वॉशिंग्टन: रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू होऊन दीड आठवडा उलटला आहे. मात्र अद्याप तरी युद्धाला पूर्णविराम लागेल, अशा कोणत्याही घडामोडी घडताना दिसत नाही. युक्रेनला लष्करी मदत पुरवू, मात्र रशियाविरोधात सैन्य उतरवणार नसल्याचं म्हणत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना भूमिका स्पष्ट केली. यानंतर आता अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडन सरकारला एक अजब सल्ला दिला आहे.

अमेरिकेच्या एफ-२२ लढाऊ विमानांवर चिनी झेंडा लावून रशियावर बॉम्ब टाकावा, असं ट्रम्प म्हणाले. त्यांच्या विधानाची अमेरिकेत चर्चा होत आहे. मी देशाचा अध्यक्ष असतो, तर रशियानं युक्रेनवर हल्लाच केला नसता, असं विधान ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. राष्ट्राध्यक्ष बायडन आणि नाटो मूर्खासारखे काम करत आहेत, अशी टीका त्यांनी केली होती. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन अतिशय हुशार असल्याचं ट्रम्प म्हणाले होते.

अमेरिकेनं एफ-२२ लढाऊ विमानांवर चिनी ध्वज लावून रशियावर बॉम्ब टाकावेत. त्यानंतर हा हल्ला चीननं केल्याचं सांगावं. मग ते आपापसात लढू लागतील आणि आपण बसून बघत राहू, असं ट्रम्प  यांनी रिपब्लिकन समितीसमोर म्हणाले होते. पक्षाचे देणगीदार यावेळी उपस्थित होते. ट्रम्प यांनी बैठकीत केलेला विनोद ऐकून सगळेच हसू लागले. 

नाटो म्हणजे कागदी वाघ असल्याची टीका ट्रम्प यांनी केली. यावेळी ट्रम्प जो बायडन यांच्यावरही बरसले. रशिया अणुशक्ती असल्यानं आम्ही त्यांच्यावर कधीही हल्ला करू शकत नाही, अशी विधानं करणं बायडन यांनी बंद करावं, असं ट्रम्प म्हणाले. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पJoe Bidenज्यो बायडन