शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Russia vs Ukraine War: युक्रेन ही तर सुरुवात? पुतीन यांचं नेमकं टार्गेट सांगतोय 'हा' झेंडा; पाहून जगाचं टेन्शन वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 19:48 IST

Russia vs Ukraine War: युक्रेनमध्ये शिरलेल्या रणगाड्यांवर दिसणाऱ्या झेंड्याची जगभर चर्चा

मॉस्को: रशिया आणि युक्रेन युद्धाचे परिणाम जगभर पाहायला मिळत आहेत. संपूर्ण जगभरातील शेअर बाजारांमध्ये पडझड सुरू आहे. कोरोना संकटातून सावरणाऱ्या अर्थव्यवस्थांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. पुतीन यांनी सुरू केलेल्या युद्धाचे परिणाम युक्रेनमध्ये ठळकपणे दिसत आहेत. बलाढ्य रशियासमोर युक्रेनची वाताहत होत आहे. पुतीन यांच्या मनात नेमकं काय चाललंय, रशियाची कारवाई कुठपर्यंत सुरू राहणार, असे प्रश्न जगाला पडले आहेत. 

युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे फोटो, व्हिडीओ सातत्यानं समोर येत आहेत. त्यातच आता रशियन रणगाड्याच्या एका फोटोमुळे जगाची चिंता वाढली आहे. फोटोत दिसणाऱ्या रणगाड्यावर सोव्हिएत युनियनचा झेंडा आहे. सोव्हिएत युनियनची ३० वर्षांपूर्वी शकलं झाली. त्यातून रशियासह १५ देशांचा जन्म झाला. याच देशांना जोडण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन प्रयत्नशील आहेत. 

सोव्हिएत युनियनच्या विघटनाचा इतिहास बदलण्याचा मानस पुतीन यांनी अनेकदा बोलून दाखवला आहे. २००८ मध्ये रशियानं जॉर्जियामध्ये सैन्य कारवाई केली. जॉर्जियाचे काही भूभाग रशियानं गिळंकृत केले. त्यानंतर २०१४ मध्ये युक्रेनचा भाग असलेला क्रिमिया द्विपकल्प रशियानं बळकावला. काही दिवसांपूर्वीच रशियानं युक्रेनच्या दोन भागांना स्वतंत्र देशांचा दर्जा दिला. यानंतर रशियानं युक्रेनसोबत युद्धाची घोषणा केली. त्यामुळे पुतीन यांची वाटचाल सोव्हिएत युनियनच्या निर्मितीच्या दिशेनं सुरू असल्याचं बोललं जात आहे. युक्रेनच्या अध्यक्षांचा मोदींना फोन युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्यासाठी रशियन फौजांचे प्रयत्न सुरू असताना युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला आहे. मोदी यांच्यासोबत संवाद साधून त्यांच्याकडे मदतीची मागणी केल्याची माहिती झेलेन्स्की यांनी ट्विट करून दिली आहे. 'पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधला. रशियाचे १ लाखाहून अधिक हल्लेखोर आमच्या भूमीवर असून ते नागरी वस्त्यांना लक्ष्य करत असल्याची माहिती त्यांना दिली. सुरक्षा परिषदेत राजकीय पाठिंबा देण्याची विनंती त्यांच्याकडे केली. आक्रमकांना एकत्र येऊन रोखुया,' असं झेलेन्स्की यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन