शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Russia vs Ukraine War: ४ लाख लोकांना बळजबरीने रशियात नेले; जेलेन्स्की सरकारचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 06:44 IST

शरण येण्यासाठी दबावतंत्र वापरलं जात असल्याचा युक्रेन सरकारचा दावा

कीव्ह : युक्रेनमधील चार लाखांहून अधिक नागरिकांना पकडून बळजबरीने रशियामध्ये नेण्यात आल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. त्यामध्ये ८४ हजार मुलांचा समावेश आहे. युक्रेनने शरणागती पत्करावी म्हणून रशिया ही कुटिल कृत्ये करीत असल्याचा दावा युक्रेनच्या जेलेन्स्की सरकारने केला आहे.युक्रेनच्या दोन फुटीरतावादी प्रांतांच्या स्वातंत्र्याला मान्यता देऊन रशियाने या देशावर २४ फेब्रुवारी रोजी आक्रमण केले. त्यानंतर युक्रेनमधील कीव्ह, लविव्ह, मारियुपोल अशा अनेक शहरांवर रशियाने हल्ले चढविले. युक्रेनला हरप्रकारे नमविण्याचा रशिया प्रयत्न करीत आहेत. युक्रेनच्या काही लाख नागरिकांना बळजबरीने रशियात नेण्यात आल्याच्या आरोपाचा पुतीन सरकारने इन्कार केला आहे. युक्रेनमधील अनेक नागरिकांना रशियामध्ये आश्रय घेण्याची इच्छा होती. म्हणून आम्ही त्यांना येऊ दिले, असे पुतीन सरकारने सांगितले.रशियाकडूून होणारी इंधन निर्यात युरोप कमी करणाररशियाकडून इंधन तेल, नैसर्गिक वायू अशा गोष्टींचा युरोपला पुरवठा होत असतो. हे अवलंबित्व कमी करण्याचा निर्णय अमेरिका व युरोपीय समुदायाने घेतला आहे. अमेरिका युरोपला यंदाच्या वर्षी द्रवरूप नैसर्गिक वायूची निर्यात १५ अब्ज क्युबिक मीटरपर्यंत वाढविणार आहे, तसेच भविष्यात या निर्यातीत आणखीही वाढ केली जाण्याची शक्यता आहे. रशियाकडून पाइपलाइनद्वारे युक्रेनमार्गे युरोपला नैसर्गिक वायू व अन्य ऊर्जास्रोतांचा पुरवठा केला जातो.युक्रेनला युरोपीय समुदायाचे सदस्यत्व देण्याची मागणी१ युक्रेनला लवकरात लवकर युरोपीय समुदायाचे सदस्यत्व देण्यात यावे, अशी मागणी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी केली आहे. जेलेन्स्की यांनी सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे युरोपच्या दौऱ्यावर आले असून, युक्रेनबाबत पाश्चिमात्य देशांच्या नेत्यांशी चर्चा करीत आहेत.२युरोपीय समुदायाचे युक्रेनला सदस्यत्व देण्याची हीच योग्य वेळ आहे. युक्रेनला मिळालेली ही एक संधी आहे. हे सदस्यत्व आम्हाला याआधीच मिळाले असते तर रशियाने युक्रेनवर आक्रमण करताना दोनदा विचार केला असता.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया