शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: बायडेन यांच्या २ मंत्र्यांचा कीव्ह दौरा; जेलेन्स्कींशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 07:35 IST

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी दावा केला की, युद्धामध्ये युक्रेनला यश, तर रशियाला अपयश येत आहे.

कीव्ह :  अमेरिकेने युक्रेनला अतिरिक्त ५३ अब्ज ६५ कोटी रुपयांची लष्करी मदत देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन व संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी युक्रेनची राजधानी कीव्ह येथे जाऊन राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्याशी युद्धाशी संबंधित बाबींवर सविस्तर चर्चा केली. युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रथमच युक्रेनचा दौरा केला आहे. 

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी दावा केला की, युद्धामध्ये युक्रेनला यश, तर रशियाला अपयश येत आहे. युक्रेनला ३०हून अधिक देश सक्रिय मदत करीत असून, आम्ही रशियावरील दबाव आणखी वाढविणार आहोत. अमेरिकेने दिलेल्या मदतीबाबत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे जेलेन्स्की यांनी आभार मानले आहेत. युक्रेनला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे व आर्थिक मदत देण्यात येत आहे. रशियावर इतर देशांनी लादलेल्या निर्बंधांबाबतदेखील जेलेन्स्की, ब्लिंकन, ऑस्टिन यांच्यात सुमारे तीन तास चाललेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. रशियाने आता पूर्व युक्रेनमधील डोनबास प्रांतात हल्ल्यांचे प्रमाण वाढविले आहे. त्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य देशांनी शस्त्रास्त्रांची मोठ्या प्रमाणावर मदत करावी, अशी मागणी जेलेन्स्की यांनी केली होती. त्याला अमेरिकेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

उणीव भरून काढली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन काही दिवसांपूर्वी पोलंडच्या दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांनी युक्रेनच्या निर्वासितांची स्थिती जाणून घेतली. मनात असूनसुद्धा केवळ सुरक्षेच्या कारणापायी बायडेन यांनी युक्रेनला भेट दिली नव्हती; पण आता त्यांच्या मंत्रिमंडळातील दोन महत्त्वाच्या मंत्र्यांनी युक्रेनचा दौरा करून ती उणीव थोड्या प्रमाणात का होईना भरून काढली आहे.

मारियुपोलमध्ये युक्रेन सैनिकांची कडवी झुंजमारियुपोल या शहरातील स्टील प्रकल्पाच्या आडोशाने युक्रेनचे सैनिक रशियाशी कडवी झुंज देत आहेत. त्यामुळे या शहरासह डोनबासवर संपूर्ण कब्जा करणे रशियाला अद्याप शक्य झालेले नाही, असा दावा ब्रिटनच्या संरक्षण खात्याने केला आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया