शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War : सर्व भारतीय सुखरूप मायदेशी परतत नाहीत, तोवर इथून निघणार नाही; किरेन रिजिजूंचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 12:01 IST

सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धात (Russia Ukraine War) अनेक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत.

Russia Ukraine War : सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धात (Russia Ukraine War) अनेक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनं 'मिशन गंगा' या अंतर्गत पावलं उचलली आहे. तसंच अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारचे चार मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये पोहोचलेत. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हेदेखील स्लोव्हाकियामध्ये पोहोचले असून ते भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी काम करत आहेत. अशात त्यांनी युक्रेनमधून सर्व भारतीयांना सुरक्षित बाहेर काढत नाही, तोवर माघारी येणार नाही असा निर्धार केला आहे.

"सर्व भारतीयांना त्या ठिकाणाहून सुरक्षित बाहेर काढण्याला आमचं प्राधान्य आहे. कोणताही भारतीय मागे राहू नये असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. ज्या ठिकाणी गोळीबार आणि बॉम्ब टाकले जात आहेत त्या ठिकाणी दुतावासाच्या कर्मचाऱ्यांना पोहोचणं शक्य नाही. सर्वांना बाहेर काढणं इतकं सोपं नाही. परिस्थिती ही खुप आव्हानात्मक आहे. परंतु आम्ही सर्वच झोकून प्रयत्न करत आहोत," असं रिजिजू म्हणाले.आपल्याला घरी सुरक्षित पोहोचवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असा संदेश आपल्या पालकांपर्यंत पोहोचवा, असंही ते विद्यार्थ्यांना म्हणाले. "युक्रेनमधून सर्व भारतीयांना सुरक्षित बाहेर काढल्याशिवाय मी या ठिकाणाहून परतणार नाही. सर्व भारतीयांना लवकरात लवकर आणि सुरक्षितरित्या त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. या स्थितीत केवळ भारतच अशी मोहीम राबवत आहे," असंही त्यांनी नमूद केलं.दिलासा पाहून आनंदयुक्रेनमधून स्लोव्हाकियाला पोहोचलेल्या आमच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा दिलासा पाहून आनंद झाला. या सर्वांची योग्य काळजी घेतली जात आहे. प्रदीर्घ परिश्रमानंतर आमच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून आनंद झाला. घरी सुरक्षित प्रवास करा, असंही काही विद्यार्थ्यांना रवाना करताना रिजिजू म्हणाले.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत