शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
2
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
3
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 20:42 IST

Russia Ukraine War Updates: डोनाल्ड ट्रम्प सातत्याने युक्रेन-रशिया संघर्ष शमवण्यासाठी प्रयत्न करत आहेत

Russia Ukraine War Updates: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू झालेले युद्ध अजूनही पूर्णपणे थांबलेले नाही. दोन्ही देश हार मानायला तयार नाहीत. यादरम्यान, काही देश मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने युक्रेन आणि रशिया यांच्यात शांतता करार घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तशातच हंगेरी येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची ट्रम्प यांच्याशी भेट होणार आहे. याबाबत जेव्हा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सूचक विधान केले. जर मला बैठकीचे निमंत्रण मिळाले, तर मीदेखील पुतिन आणि ट्रम्प यांच्यासोबत शिखर परिषदेला उपस्थित राहण्यास तयार आहेत.

बैठकीला उपस्थित राहण्याबद्दल...

अमेरिका आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी गेल्या गुरुवारी घोषणा केली की, ते येत्या काही दिवसांत बुडापेस्टमध्ये युक्रेन युद्धावर चर्चा करण्याची योजना आखत आहेत. ट्रम्प यांनी घोषणा केली होती की ते युक्रेनमधील युद्ध संपवण्याच्या उद्देशाने दुसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी बुडापेस्टमध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेतील. बुडापेस्टमध्ये पुतिन यांच्यासोबत होणाऱ्या दुसऱ्या फेरीच्या शांतता चर्चेबाबत झेलेन्स्की म्हणाले की, ते या बैठकीला उपस्थित राहण्यासही तयार आहेत. ट्रम्प आणि पुतिन यांनी पुढील काही आठवड्यात हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे भेटण्याची योजना जाहीर केल्यानंतर झेलेन्स्की यांचे हे विधान आले आहे. रशियाच्या २०२२च्या आक्रमणापासून सुरू झालेल्या साडेतीन वर्षांच्या युद्धाचा अंत करण्यासाठी शांतता करार करण्यासाठी वॉशिंग्टनच्या नव्याने सुरू असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. ट्रम्प रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेल्या संघर्षाचा अंत करण्यावर भर देत आहेत.

झेलेन्स्की काय म्हणाले?

पत्रकारांशी बोलताना झेलेन्स्की म्हणाले, "जर मला बुडापेस्टला आमंत्रित केले गेले, जर आमंत्रण अशा स्वरूपात असेल जिथे आम्ही तिघे भेटणार असू किंवा शटल डिप्लोमसी प्रमाणे, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पुतिनला भेटणार आणि नंतर मलाही भेटणार असेल, तर मी या स्वरूपावर काहीसा सहमत होऊ शकेन." पण झेलेन्स्की यांनी हंगेरीच्या स्थळाच्या निवडीवर टीका केली. हंगेरीचे नेते व्हिक्टर ऑर्बन यांचा उल्लेख करत झेलेन्स्की म्हणाले, "युक्रेनला सर्वत्र रोखणारा पंतप्रधान युक्रेनियन लोकांसाठी काहीही सकारात्मक करू शकतो किंवा संतुलित योगदान देऊ शकतो असे मला वाटत नाही." दरम्यान, सत्तेत आल्यापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हा संघर्ष लवकरात लवकर संपवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी युक्रेनियन आणि रशियन अधिकाऱ्यांमध्ये अनेक वेळा थेट चर्चा घडवून आणली आहे परंतु त्यांच्या राजकीय प्रयत्नांना अद्याप कोणतेही महत्त्वपूर्ण यश मिळालेले नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Putin-Trump Meeting: Zelenskyy Ready to Attend if Invited Amid Ukraine War

Web Summary : Amidst the ongoing Russia-Ukraine war, a Putin-Trump meeting is planned in Hungary. Zelenskyy expressed readiness to attend if invited, despite criticizing Hungary's stance on Ukraine. Trump aims to facilitate peace talks, though past efforts yielded limited success.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प