शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine War: युद्ध सुरू असतानाच दिसून आलं झेलेन्स्कींचं दुःख, रशियानं युक्रेनच्या एवढ्या भागावर केला आहे कब्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 01:36 IST

यूकइन्फॉर्म या वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, लोकांना आणि राजकीय नेत्यांना संबोधित करताना राष्ट्रपती झेलेन्स्की म्हणाले, रशियन सैन्याने युक्रेनच्या लोकवस्ती असलेल्या 3,620 ठिकाणांवर हल्ला केला. त्यांपैकी 1,017 आधीच मुक्त झाले आहेत.

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध अद्यापही थांबण्याचे चिन्ह नाही. यातच, युक्रेनच्या 20 टक्के भूभागावर आता रशियन सैन्याने कब्जा केला आहे. मात्र, युक्रेनच्या सैन्याने युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत 1,017 ठिकाणं रशियाच्या कब्जातून मुक्त केली आहेत, असे युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी गुरुवारी सांगितले.

यूकइन्फॉर्म या वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, लोकांना आणि राजकीय नेत्यांना संबोधित करताना राष्ट्रपती झेलेन्स्की म्हणाले, रशियन सैन्याने युक्रेनच्या लोकवस्ती असलेल्या 3,620 ठिकाणांवर हल्ला केला. त्यांपैकी 1,017 आधीच मुक्त झाले आहेत. इतर 2,603 ठिकाणे मुक्त करणे बाकी आहे. सध्या आमच्या जवळपास 20 टक्के भूभागावर अर्थात 125,000 चौरस किमी भूभागावर रशियाने कब्जा केला आहे. 

'युद्धात 243 मुले मारली गेली' -झेलेन्स्की यांनी दावा केला आहे, की या युद्धात आतापर्यंत 243 मुले मारली गेली आहेत, तर 446 जखमी आणि 139 बेपत्ता आहेत. हा आकडा अधिकही असू शकतो कारण त्यांच्या सरकारकडे रशियन सैन्याने ताब्यात घेतलेल्या भागातील परिस्थितीची माहिती नही. 

अमेरिकेने युक्रेनला देणार अत्याधुनिक मिसाइल सिस्टम -रशिया-युक्रेन युद्धात, अमेरिकेने युक्रेनला अत्याधुनिक मिसाइल सिस्टम आणि इतरही काही शस्त्रास्त्रे देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या या घोषणेनेनंतर रशिया जबरदस्त भडकला असून, अमेरिका आगीत तेल टाकत असल्याचे रशियाने म्हटले आहे. रशियाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात युक्रेनला अमेरिकेने दिलेल्या मदतीचा हा 11वा हप्ता असेल. यूएस-निर्मित HIMARS ही हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टिम  युक्रेनला देण्यात येईल, असे यूएस प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने म्हटले आहे.

अमेरिका आणि रशियाची टक्कर होण्याचा धोका -अमेरिकेच्या या घोषणेनंतर, युक्रेनला अशा प्रकारच्या शस्त्रास्त्रांची खेप पाठवल्यास थेट अमेरिका आणि रशियाची टक्कर होण्याचा धोका वाढेल, असा इशारा रशियाने दिला आहे. कुठल्याही प्रकारच्या शस्त्रास्त्रांच्या सुरू असलेल्या अथवा वाढणारा पुरवठ्यामुळे धोका अधिक वाढेल, असे रशियाचे उप परराष्ट्रमंत्री सर्गेई रयाबकोव यांनी आरआयए नोवोस्ती या वृत्त संस्थेशी बोलताना म्हटले आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाAmericaअमेरिकाwarयुद्ध