शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine War : युक्रेनला शस्त्रपुरवठा करण्याची अमेरिकेची घोषणा; रशिया भडकला, दिला असा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 02:10 IST

रशियाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात युक्रेनला अमेरिकेने दिलेल्या मदतीचा हा 11वा हप्ता असेल. यूएस-निर्मित HIMARS ही हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टिम  युक्रेनला देण्यात येईल, अशी पुष्टी यूएस प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने केली आहे.

रशिया-युक्रेन युद्ध अद्यापही थांबण्याचे नाव नाही. यातच आता अमेरिकेने युक्रेनला अत्याधुनिक मिसाइल सिस्टम आणि इतरही काही शस्त्रास्त्रे देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या या घोषणेनेनंतर रशिया जबरदस्त भडकला असून, अमेरिका आगीत तेल टाकत असल्याचे रशियाने म्हटले आहे.

रशियाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात युक्रेनला अमेरिकेने दिलेल्या मदतीचा हा 11वा हप्ता असेल. यूएस-निर्मित HIMARS ही हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टिम  युक्रेनला देण्यात येईल, अशी पुष्टी यूएस प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने केली आहे.

अमेरिका आणि रशियाची टक्कर होण्याचा धोका -अमेरिकेच्या या घोषणेनंतर, युक्रेनला अशा प्रकारच्या शस्त्रास्त्रांची खेप पाठवल्यास थेट अमेरिका आणि रशियाची टक्कर होण्याचा धोका वाढेल, असा इशारा रशियाने दिला आहे. कुठल्याही प्रकारच्या शस्त्रास्त्रांच्या सुरू असलेल्या अथवा वाढणारा पुरवठ्यामुळे धोका अधिक वाढेल, असे रशियाचे उप परराष्ट्रमंत्री सर्गेई रयाबकोव यांनी आरआयए नोवोस्ती या वृत्त संस्थेशी बोलताना म्हटले आहे.

शस्त्रास्त्रे पुरविण्याची अमेरिकेची घोषणा - रायबकोव्ह हे, मॉस्को आणि वॉशिंग्टन यांच्यात थेट सामना होण्याच्या शक्यतेसंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देत होते. यावेळी, अमेरिका रशियाविरुद्ध युद्ध करण्याच्या मूडमध्ये दिसत आहे. लढाईमध्ये युक्रेन कायम रहावा आणि हा रशियाचा सामरिक पराभव सांगता यावा, असे अमेरिकेला वाटते. पण हे धोकादायक आहे, अशेही रायबकोव्ह यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी राष्ट्रपती ज्यो बायडेन प्रशासनाने मंगळवारी, युक्रेनला मध्यम पल्याची रॉकेट सिस्टिम देण्याची घोषणा केली आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाAmericaअमेरिकाUSअमेरिकाwarयुद्ध