शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: रशियन सैनिकांना त्यांच्या पत्नी सांगतात, जा युक्रेनियन महिलांवर बलात्कार करा! खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 17:28 IST

Russia-Ukraine War Updates : "त्या म्हणत आहेत, की जा आणि त्या युक्रेनियन महिलांवर बलात्कार करा. फक्त ते आमच्यासोबत शेअर करू नका. आम्हाला सांगू नका."

रशिया आणि युक्रेनदरम्यान गेल्या नऊ महिन्यांपासून जबरदस्त युद्ध सुरू आहे. या युद्धाचा अद्याप कोणताही निकाल लागलेला नाही. युक्रेनवर रशियाचे आक्रमक हल्ले सुरूच आहेत. तर युक्रेनही पूर्ण ताकदीनिशी प्रत्युत्तर देत आहे. यातच आता युक्रेनच्या फर्स्ट लेडी ओलेना झेलेंस्की यांनी रशियन सैनिकांवर मोठा आरोप केला आहे. युक्रेनमध्ये रशियन सैनिक बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचा शस्त्रा प्रमाणे वापर करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ओलेना झेलेंस्की यांनी लंडनमध्ये एका आंतरराष्ट्रीय सम्मेलनात बोलताना हे वक्तव्य केले आहे. याच वेळी, रशियन सैनिकांना त्यांच्या पत्नी युक्रेनियन महिलांवर बलात्कार करण्यास सांगत आहेत, असा दावा ओलेना यांनी केला आहे.

शस्त्राप्रमाणे वापर करतायत रशियन सैनिक -स्काय न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ओलेना झेलेन्स्की यांनी दावा केला आहे की, रशियन सैनिकांच्या पत्नींनी युक्रेनीयन महिलांवर बलात्कार करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. युक्रेनेचे राष्ट्रपती वलोडिमिर झेलेंस्की यांच्या पत्नीने रशियन सैनिकांकडून उघडपणे होत असलेल्या लैंगिक हिंसाचारावर भाष्य केले आहे. त्या पुढे म्हणाल्या, 

"लैंगिक हिंसा हा एखाद्यावर वर्चस्व सिद्ध करण्याचा सर्वात क्रूर आणि सर्वात वाईट मार्ग आहे. अशा हिंसाचाराच्या बळींसाठी, युद्धाच्या वेळी साक्ष देणे कठीण आहे. कारण अशा काळात कुणालाही सुरक्षित वाटत नाही. याचा ते (रशियन सैनिक) शस्त्रासारखा वापर करत आहेत. या युद्धात त्यांच्या शस्त्रागारामध्ये हे आणखी एक शस्त्र आहे. यामुळे, ते याचा उघडपणे वापर करत आहेत.'' 

'जा, युक्रेनिय महिलांवर बलात्कार करा' -ओलेना यांनी दावा केला आहे, की आम्ही पाहत आहोत की, रशियन सैनिक याबद्दल फार मोकळे आहेत. ते त्यांच्या नातेवाईकांशी फोनवर यासंदर्भात बोलतात, आम्ही फोनवरील संभाषणातून ते पकडण्यात यशस्वी झालो आहोत. एवढेच नाही, तर, ओलेन यांनी दावा केला आहे की, रशियन सैनिकांच्या बायकाच त्यांना यासाठी प्रोत्साहन देत आहेत. त्या म्हणत आहेत, की जा आणि त्या युक्रेनियन महिलांवर बलात्कार करा. फक्त ते आमच्यासोबत शेअर करू नका. आम्हाला सांगू नका. यामुळेच, या विषयावर वैश्विक पातळीवर प्रतिक्रिया यायला हव्यात. तसेच हा युद्धगुन्हा म्हणून मानाला जावा आणि सर्व गुन्हेगारांना जबाबदार धरणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशिया