शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War : युक्रेनच्या शेतकऱ्याने ट्रॅक्टरला बांधला रशियाचा रणगाडा; 'तो' Video तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 09:56 IST

Russia Ukraine War Video : युक्रेनचा हा शेतकरी रस्त्यावर ट्रॅक्टरला रणगाडा बांधून ओढत असल्याचं व्हिडीओतून दिसून येतं आहे.

सध्या जगभरात रशिया-यूक्रेन युद्धाची बरीच चर्चा आहे. रशियानं यूक्रेनवर हल्ला केल्यापासून आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या हालचाली पाहायला मिळाल्या आहेत. गेल्या सहा दिवसांपासून रशिया-यूक्रेन युद्ध सुरू आहे. युद्धाची घोषणा करणाऱ्या रशियावर जगभरातून टीका होत आहे. नाटो (NATO) सह अन्य प्रमुख संघटना या युद्धासाठी रशियाला जबाबदार धरत आहेत. याच दरम्यान अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. अशाच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून यामध्ये युक्रेनच्या एका शेतकऱ्याने ट्रॅक्टरला रशियाचा रणगाडा बांधल्याचं पाहायला मिळत आहे. 

युक्रेनमधील एक शेतकरी रशियाला न घाबरता त्यांचा रणगाडाच आपल्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने पळवून नेत आहे. ऑस्ट्रियातील युक्रेनचे राजदूत ऑलेक्झांडर शेरबा (Olexander Scherba) यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. युक्रेनचा हा शेतकरी रस्त्यावर ट्रॅक्टरला रणगाडा बांधून ओढत असल्याचं व्हिडीओतून दिसून येतं आहे. तर एक व्यक्ती रणगाड्यामागे धावताना दिसत आहे. 'हे जर खरं असेल तर शेतकऱ्याने पळवलेला हा पहिला रणगाडा असेल' असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये देखील त्यांनी म्हटलं आहे. 

एका रणगाड्याला दोरी बांधून एक शेतकरी तो टोईंग केल्याप्रमाणे आपल्या ट्रॅक्टरने खेचत घेऊन चालल्याचा हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला आहे. ब्रिटीश खासदार जॉनी मेर्कर यांचाही यामध्ये समावेश आहे. "मी काही तज्ज्ञ नाही पण रशियाने केलेलं हे आक्रमण फारसं प्रभावी ठरताना दिसत नाही. आज एका युक्रेनियन ट्रॅक्टरने रशियाचा रणगाडा चोरुन नेला" अशा कॅप्शनसहीत ब्रिटीश खासदाराने हा व्हिडीओ शेअर केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. युक्रेनवर हल्ला करण्यासाठी निघालेल्या रशियन सैनिकाच्या एका घोडचुकीमुळे ते यूक्रेनच्या हाती लागलेत. आता हे दोन्ही सैन्य जवानांना यूक्रेननं कैद केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघंही रशियातून यूक्रेनवर हल्ला करण्यासाठी निघाले होते. परंतु त्यांनी गाडीतील पेट्रोल चेक केले नाही. 

अर्ध्या रस्त्यातच त्यांच्या गाडीतील इंधन संपुष्टात आले. त्यामुळे ते यूक्रेन सैन्याच्या हाती लागले. या दोघांना बंदी बनवून जेलमध्ये टाकलं आहे. परंतु अद्याप हे स्पष्ट नाही की दोघं टँक चालवत होते की, अन्य लढाऊ वाहन? मात्र यूक्रेनच्या सीमेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या गाडीचं पेट्रोल संपलं. त्यानंतर ते स्थानिक पोलिसांकडे मदतीला गेले. युक्रेनची राजधानी कीवच्या इंडिपेंडेंट न्यूज आऊलेटनं दोघांचे फोटो शेअर केलेत. त्यात दोघांच्या हातात बेड्या दिसत आहेत. या दोन रशियन जवानांना अटक करण्यात आली आहे. ना प्रिजनर ऑफ वॉर घोषित केले आहे.

 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाFarmerशेतकरी