शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Zelenskyy-PM Modi: पंतप्रधान मोदींसोबतच्या चर्चेनंतर झेलेंस्की खुश! ट्विट करत मानले भारताचे आभार, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 16:53 IST

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ‘35 मिनिटे चाललेल्या या फोनवरील चर्चेदरम्यान, दोन्ही देशाच्या नेत्यांमध्ये युक्रेनमध्ये उद्भवलेल्या स्थितीवर चर्चा झाली...

युक्रेनचे राष्‍ट्रपती वलोदिमिर झेलेंस्की (Volodymyr Zelenskyy) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेसंदर्भात आभार मानले आहेत. झेलेंस्‍की ट्विट करत म्हणाले, रशियाच्या आक्रामक कारवाईला युक्रेनकडून कशा प्रकारे प्रत्त्युत्तर देण्यात येत आहे, यासंदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली. तसेच, युद्धाच्या काळात भारतीय नागरिकांना दिली जाणारी मदत आणि वरिष्ठ स्तरावर थेट चर्चेसंदर्भातील युक्रेनची वचनबद्धता याचे भारताने कौतुक केले, असेही ते म्हणाले.

एवढेच नाही, तर युक्रेनमधील जनतेला करण्यात येत असलेल्या मदतीबद्दल आपण भारताचे आभारी आहोत, असेही झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी झालेल्या एका फोन कॉलमध्ये, युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ‘35 मिनिटे चाललेल्या या फोनवरील चर्चेदरम्यान, दोन्ही देशाच्या नेत्यांमध्ये युक्रेनमध्ये उद्भवलेल्या स्थितीवर चर्चा झाली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारतीय नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी युक्रेन सरकारने केलेल्या मदतीबद्दल राष्ट्रपती झेलेंस्की यांचे आभार मानले.’

पंतप्रधान मोदींनी झेलेन्स्की यांच्यासोबत दुसऱ्यांदा साधला संवाद -रशियाने 24 फेब्रुवारीला कीव्हवर लष्करी कारवाई सुरू केली, तेव्हापासून आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनच्या नेत्यासोबत दुसऱ्यांदा संवाद साधला आहे. यापूर्वीही 26 फेब्रुवारीला पहिल्यांदा बोलणे झाले होते. दरम्यान, राष्ट्रपती पुतिन यांनी कीव्ह, सुमी, खारकीव्ह आणि मारियूपोलमध्ये नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाता यावे, यासाठी तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धrussiaरशिया