शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: नागरिकांचे हात बांधून, गोळ्या घालून हत्या, युक्रेनचा रशियावर आरोप; रस्त्यांत सापडले मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 07:08 IST

Russia Ukraine War: युक्रेनमध्ये रशियाच्या सैनिकांनी केलेल्या भीषण अत्याचारांची उदाहरणे आता समोर येऊ लागली आहे. या युद्धाच्या ३९ व्या दिवशी युक्रेनने असा आरोप केला की, ऱशियाच्या सैनिकांनी युक्रेनमधील बुका या भागामध्ये काही जणांचे हात बांधून व त्यांच्या डोक्यात गोळ्या मारून हत्या केली.

कीव्ह : युक्रेनमध्ये रशियाच्या सैनिकांनी केलेल्या भीषण अत्याचारांची उदाहरणे आता समोर येऊ लागली आहे. या युद्धाच्या ३९ व्या दिवशी युक्रेनने असा आरोप केला की, ऱशियाच्या सैनिकांनी युक्रेनमधील बुका या भागामध्ये काही जणांचे हात बांधून व त्यांच्या डोक्यात गोळ्या मारून हत्या केली. अनेकांचे मृतदेह रस्त्यांमध्ये फेकून देण्यात आले. या आरोपांबाबत रशियाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. कीव्हच्या बुका, इप्रिन, होस्टोमेल या उपनगरांमधून रशियाचे सैन्य माघारी गेल्यानंतर ती सारी ठिकाणे युक्रेनच्या सैनिकांनी ताब्यात घेतली आहे. या परिसरात रशियाच्या सैनिकांनी हत्याकांडे केल्यानंतर ते मृतदेह रस्त्यांत किंवा इमारतींच्या आडोशाला फेकून दिल्याचे आढळून आले. बुका येथे व इतर ठिकाणी रस्त्यांवर टाकून दिलेल्या युक्रेन नागरिकांच्या मृतदेहांचे व्हिडीओ सोशल मीडियावर झळकले आहेत. 

‘रशियाचे अत्याचार इसिसपेक्षाही भयंकर’युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दमित्रो कुलेबा यांनी सांगितले की, युक्रेनमधील अनेक निरपराध नागरिकांना रशियाच्या लष्कराने ठार मारले आहे. रशियाने युक्रेनमध्ये केलेले अत्याचार हे इसिस या दहशतवादी संघटनेपेक्षाही भयंकर आहेत. रशियाच्या फौजा कीव्ह परिसरातून मागे हटल्या असल्या, तरी त्यांनी मारियुपोलसहित आणखी काही भागांवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. 

आणखी निर्बंध लादा : युक्रेन    रशियाच्या लष्कराने केलेल्या अनन्वित अत्याचारांचे पुरावे आता जगासमोर आले आहेत. त्यामुळे रशियावर आणखी कडक निर्बंध लादावे, अशी मागणी युक्रेनने केली आहे.     अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी याआधी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. मात्र, तरीही युक्रेनशी युद्ध थांबविण्यास रशिया तयार नाही. 

रशियाकडून नैसर्गिक वायूची खरेदी बंद    लिथुआनिया या देशाने रशियाकडे नैसर्गिक वायू खरेदी करणे बंद केले असून हा निर्णय या महिन्याच्या प्रारंभापासून लागू झाला आहे.     असा निर्णय घेणारा हा युरोपातील पहिला देश आहे. युरोपीय समुदायातील अन्य देशांनीही आपले अनुकरण करावे, असे लिथुआनियाने म्हटले आहे.     रशियाने युक्रेनवर हल्ले सुरू केल्याने युरोपातील अनेक देशांनी रशियावर नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्ध