शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: युद्ध थांबवा! तुर्कीच्या राष्ट्रपतींचं पुतिन यांना आवाहन, रशियानं समोर ठेवल्या या 'भयंकर' अटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 20:44 IST

तुर्कीच्या राष्ट्रपती कार्यालयाने म्हटले आहे की, एर्दोगन यांनी रशियाच्या राष्ट्रपतींसोबत झालेल्या संभाषणात तत्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धाचा परिणाम काय होईल? या विचाराने संपूर्ण जग चिंतित आहे. यातच, युद्धाच्या 11 व्या दिवशी रविवारी तुर्कीचे (Turkey) राष्ट्रपती Recep Tayyip Erdogan यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली.

एर्दोगन यांनी पुतिन यांच्यासोबत तब्बल 1 तास केली चर्चा -तुर्कीच्या राष्ट्रपती कार्यालयाने म्हटले आहे की, एर्दोगन यांनी रशियाच्या राष्ट्रपतींसोबत झालेल्या संभाषणात तत्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले आहे. सुमारे तासभर चाललेल्या या फोन कॉलमध्ये एर्दोन म्हणाले, युक्रेनमधील मानवी संकट पाहता रशियाने काही काळासाठी युद्ध थांबवायला हवे. तसेच, संघर्ष संपविण्यासाठी युद्धाऐवजी राजकीय तोडगा काढायला हवा, असे आवाहनही एर्दोगन यांनी पुतिन यांना केले आहे.

मध्यस्थ बनण्याची दिली ऑफर -तुर्कीचे रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत. सध्याच्या युद्ध स्थितीत मध्यस्थ बनून शांतता प्रस्थापित करण्याचे श्रेय घेण्याचा तुर्कीचा इरादा आहे. एवढेच नाही, तर त्यांनी पुढील आठवड्यात दोन्ही देशांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी आमंत्रितही केले आहे. तसे यावेळी चर्चेदरम्यान, हे संकट संपविण्यासाठी आपण आपल्या बाजूने सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत, असेही एर्दोगन यांनी म्हटले आहे.

पुतिन यांनी सांगितल्या आपल्या अटी -चर्चेदरम्यान पुतिन यांनी एर्दोगन यांना युद्धविरामासाठी रशियाच्या अटी सांगितल्या. तसेच, जोवर युक्रेन या अटी मान्य करत नाही, तोपर्यंत युद्ध थांबणार नाही, असेही पुतिन यांनी  म्हटले आहे. यात, युक्रेनच्या जागतिक घडामोडींपासून तटस्थ रहण्याचा आणि युक्रेनच्या निशस्त्रीकरणाच्या मुद्याचा समावेश आहे. याशिवाय, रशिया आपले लक्ष्य साध्य केल्याशिवाय थांबणार नाही, असेही पुतिन यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाwarयुद्ध