शहरं
Join us  
Trending Stories
1
Brahmos Deal with Vietnam : 'ब्रह्मोस' भारताला आणखी मालामाल करणार, हा छोटासा देश चीनशी टक्कर घेणार; होणार 700 मिलियन डॉलरची डील!
2
"तुम मराठी लोग गंदा है...", घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद, मनसैनिकांनी काय केलं पाहा...
3
Swami Samartha: आपल्यावर स्वामी कृपा होणार असल्याचे संकेत कसे ओळखावेत? जाणून घ्या!
4
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शनी देणार 'या' पाच राशींना अक्षय्य धनलाभ आणि कीर्ती!
5
"...म्हणून जाती धर्माचे मुद्दे पुढे केले जात आहेत का?", जयंत पाटलांचा महायुती सरकारला सवाल
6
ट्रम्प टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेची रिझर्व्ह बँकही चिंतेत; अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्यक्त केली मोठी भीती
7
कामाच्या वेळी पायावर पाय ठेवला तरी शिक्षा, मुंबईच्या तरुणाचा भयंकर अनुभव, 60 जणांची सुटका
8
लग्न झालेल्या लोकांना विसरण्याचा आजाराचा जास्त धोका? 'ही' आहेत डिमेंशियाची लक्षणं अन् कारणं
9
"मला मुलगी झाल्याने काही लोक निराश झाले", सोहा अली खानचा खुलासा; म्हणाली, "मी तर..."
10
यूट्युबवर व्हिडीओ पाहून रिक्षाचोरीची 'मास्टरी'! एमकॉम, बी टेक सुशिक्षित चोरट्यांचेही आव्हान
11
भयंकर! ४०० प्रवाशांसह बोट नदीत उलटली, ५० जणांचा मृत्यू, १०० जण बेपत्ता
12
VIDEO: 'सुपर ओव्हर'मध्ये राजस्थानला होती जिंकायची संधी, पण 'फ्री हिट' मिस झाली अन् मॅच गमावली
13
"तुमचे १०० बाप आले तरी..."; गरजला बाळासाहेबांचा 'एआय' आवाज; भारावले शिवसैनिक!
14
रोटी, कपडा और मकान नव्हे; आता हवेत लाइक, व्ह्यूज आणि सबस्क्रायबर
15
"मुस्लीम असून मी हिंदूशी विवाह केल्याने...", आंतरधर्मीय लग्नामुळे १० वर्षांनीही सोहा खानला करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना
16
नवऱ्याचा काटा काढला अन् बेडवर साप ठेवला, कारण...; बायकोचा विषारी प्लॅन, असा झाला पर्दाफाश
17
सुरेश धस-धनंजय मुंडे आज एकत्र दिसणार?; शिरूर कासारमधील सोहळ्याकडे राज्याचं लक्ष
18
आयपीएलदरम्यान बीसीसीआयची मोठी कारवाई, सहाय्यक प्रशिक्षकांसह तिघांना पदावरून हटवलं!
19
"मी माझी फिल्म बघितली अन्.."; 'सुशीला सुजीत' सिनेमा पाहिल्यावर सोनाली कुलकर्णी काय म्हणाली?

रशिया युक्रेन युद्धाला तीन वर्ष पूर्ण! पुतिन यांचा चीनच्या जिनपिंगना फोन, काय झाली चर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 20:17 IST

Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाला तीन वर्ष होत आली, पण युद्ध अद्याप थांबलेले नाही

Russia Ukraine War : सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन ( Vladimir Putin ) यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ( Xi Jinping ) यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. रशिया-युक्रेन युद्धाला तीन वर्ष होत आली, पण युद्ध अद्याप थांबलेले नाही. अशातच या दोन राष्ट्रप्रमुखांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली. पुतिन यांनी जिनपिंग यांना रशिया आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या चर्चेचीही माहिती दिली. यासोबतच, रशिया आणि चीनमधील व्यापक भागीदारी आणि धोरणात्मक संबंध वाढवण्यावरही सखोल चर्चा झाली.

पुतिन - जिनपिंग यांच्यात चर्चा काय?

पुतिन आणि शी जिनपिंग यांच्यातील दीर्घ दूरध्वनी संभाषणादरम्यान, युक्रेनबाबत रशिया आणि अमेरिकेत सुरू असलेल्या चर्चेची माहिती त्यांनी दिली. रशिया आणि अमेरिका यांच्यात सुरू झालेल्या चर्चेला चीनने पाठिंबा दर्शविला आहे. युक्रेनियन संघर्ष शांततेने सोडवण्याचे मार्ग शोधण्यात मदत करण्याची तयारी चीनने दर्शवली. याशिवाय, दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांनी अर्थव्यवस्था आणि व्यापार, गुंतवणूक, संस्कृती, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात फायदेशीर सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली. पुतिन आणि जिनपिंग यांच्यातील चर्चेत बीजिंगमध्ये होणाऱ्या आगामी शांघाय शिखर परिषदेवर साधकबाधक चर्चा झाली.

रशिया - युक्रेन युद्धाची तीन वर्षे

आज रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन तीन वर्ष पूर्ण झाली. याच दिवशी २०२२ मध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाला सुरुवात झाली. २०२२ मध्येही युद्ध सुरू होण्यापूर्वी, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी शी जिनपिंग यांचीही भेट घेतली होती. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू होऊन आता तीन वर्षे उलटून गेली तरीही युद्ध थांबलेले नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशिया आणि युक्रेनमधील युद्ध रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. इतरही अनेक देशांंचे राष्ट्रप्रमुख या प्रयत्नात आहेत, पण युद्ध केव्हा थांबेल याची कल्पना अद्यापही कुणाला नाही.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनXi Jinpingशी जिनपिंगchinaचीन