शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: युद्धात रशियन सैन्याला सळो की पळो करणाऱ्या युक्रेनच्या त्या बहादूर वैमानिकाला अखेर वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 12:43 IST

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात रशियन सैन्याची दाणादाण उडवणारा एक वैमानिक घोस्ट ऑफ किव्ह नावाने प्रसिद्धीस आला होता. त्याने एकट्याने युद्धात रशियाची ४० हून अधिक विमाने पाडली होती.

किव्ह - फेब्रुवारी महिन्यात हल्ला केल्यानंतर आता सव्वा दोन महिने होत आले तरी रशियाला युक्रेनप कब्जा मिळवता आलेला नाही. बलाढ्य रशियाच्या आक्रमणाला युक्रेनच्या सैन्याने चिवट प्रतिकार करत थोपवून धरले होते. यामध्ये रशियन सैन्याची दाणादाण उडवणारा एक वैमानिक घोस्ट ऑफ किव्ह नावाने प्रसिद्धीस आला होता. त्याने एकट्याने युद्धात रशियाची ४० हून अधिक विमाने पाडली होती. दरम्यान, युद्धात या वैमानिकाला वीरमरण आलं असून,  द लंडन टाइम्स ऑफ लंडनने त्याची ओळख समोर आणल्याचा दावा केला आहे. या वैमानिकाचं नाव मेजर स्टीफन ताराबल्का होतं. त्यांनी २९ वर्षांच्या जीवनात असे काही शौर्य करून दाखवले की, ज्यामुळे त्यांना युक्रेनमधील शौर्याचा सर्वोच्च सन्मान आणि हीरो ऑफ युक्रेन या पदवीने मरणोत्तर सन्मानित करण्यात आले.

घोस्ट ऑफ किव्ह किंवा किव्हचं भूत या नावाने चर्चित या पायलटने युद्धापूर्वीच रशियाच्या १० लढाऊ विमानांच्या चिंधड्या उडवल्या होत्या. त्यानंतर जगभरात त्याची चर्चा झाली होती. द टाइम्सच्या वृत्तानुसार मेजर स्टीफन पश्चिम युक्रेनमधील एका छोट्याशा गावात जन्मले होते. त्यांचं कुटुंब व्यावसायिक होतं. मात्र स्टीफन यांनी लगानपणापासूनच वैमानिक होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्यांनी ते स्वप्न साकार केलं आणि आता युद्धात मोठा पराक्रम गाजवला.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धात मेजर स्टीफन यांनी मिग-२९ विमान उडवून शत्रूचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. युद्ध सुरू होताच त्यांनी रशियाच्या हवाई दलाची १० लढाऊ विमाने उद्ध्वस्त केली. रशियासारख्या बलाढ्य सैन्याला एका सैनिकाने हादरवल्यामुळे युक्रेनच्या सैन्यदलाचा आत्मविश्वास दुणावला होता. मेजस स्टीफन हे १३ मार्च रोजी पुन्हा एकदा रशियन विमानांची शिकार करण्यासाठी गेले असताना शत्रूच्या विमानांनी त्यांना चहुबाजूंनी घेरले. त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यात त्यांना वीरमरण आले.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्ध