शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

Russia Ukraine War : शेवटी आईच ती! फक्त बुटावरून 'तिने' ओळखला लेकाचा मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 15:27 IST

Russia Ukraine War : एका आईने फक्त बुटावरून आपल्या लेकाचा मृतदेह ओळखला आहे. मन सुन्न करणारी एक घटना घडली आहे.

युक्रेनमध्ये विध्वंस सुरूच असून या युद्धात अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रशियन सैन्याने निरपराध लोकांची हत्या केल्याचा युक्रेनचा दावा आहे. अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. याच दरम्यान मन सुन्न करणारी एक घटना घडली आहे. एका आईने फक्त बुटावरून आपल्या लेकाचा मृतदेह ओळखला आहे. युद्धात आपला लेक गमावलेल्या आईचे अश्रू थांबण्याचे नाव घेत नाहीत. मुलाचा मृतदेह पाहून तिला मोठा धक्का बसला. या आईला आपल्या मुलाचा मृतदेह पेट्रोल पंपामागे सापडला. तिने फक्त बुटावरून मुलाचा मृतदेह ओळखला. 

मुलाचा मृतदेह पाहताच माझा छोटा मुलगा म्हणत तिने आक्रोश केला. शेजारीच असलेल्या एका व्यक्तीने मुलाच्या आईला मागे खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र थोड्या वेळ तरी मला मुलाला बघू द्या, असं म्हणत महिलेने तिला पाहण्यासाठी विनंती केली. रशियन सैन्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला हा मुलगा 23 वर्षांचा होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. युक्रेनमधील परिस्थिती अत्यंत भीषण झाली आहे. रशियन सैन्याने क्रूरतेचा कळस गाठला आहे. अंगावर काटा आणणाऱ्य़ा अनेक घटना आणि थरकाप उडवणारे अनेक फोटो हे सातत्याने समोर येत आहेत. 

बूचा शहरात रस्त्यावर मृतदेह पडले आहेत. यानंतर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. रशियन सैन्याने बूचा शहरात टॉर्चर चेंबर तयार केले आहेत. जिथे मृतदेहांचे हातपाय बांधून ठेवण्यात आले आहेत. मारियूपोल, खारकीव्हनंतर आता बूचा शहर उद्ध्वस्त झालं आहे. युक्रेनमधील लोकांना त्रास देण्यासाठी बूचाच्या चिल्ड्रन हेल्थ रिसॉर्टच्या बेसमेंटमध्ये टॉर्चर चेंबर बनवलं आहे. या बेसमेंटमध्ये पाच लोकांचे मृतदेह आढळून आले असून मृतदेहांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मृतदेहांचे काही भयंकर फोटो आता समोर येत आहेत. युक्रेनने दावा केला आहे की रशिया बूचा शहरात नरसंहार करत आहे. आतापर्यंत 300 हून अधिक सामान्य नागरिकांना मारलं आहे. तसेच लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 

युक्रेनमधील लोक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. बूचा शहरात सध्या वीज, पाणी आणि गॅसची सध्या कोणतीही व्यवस्था नाही. अनेक लोक घर सोडून पळून गेले आहेत. रशियन सैन्य बूचा शहरात लोकांवर अमानुष अत्याचार करत आहेत. लोकांचे हात-पाय बांधून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जात आहेत. घरामध्ये असलेल्या लोकांना बाहेर काढून त्यांचा मोबाईल तपासला जात आहे. रशियन सैनिक महिला आणि मुलींवर अत्याचार करत आहेत. याच दरम्यान युक्रेनमध्ये एका 10 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आला असून तिला लोखंडी सळीने चटके दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया