शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: सौदीच्या राजाने पुतीन यांच्या बाजुने 'फौज' उभी केली; ओपेक रशियासोबतच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 11:42 IST

कच्च्या तेलाचे निर्यातदार असलेल्या सौदी अरेबियाने अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांचा दबाव झुगारून लावला आहे.

युक्रेनवर हल्ला केल्यावरून अमेरिकेसह युरोपियन देश रशियावर निर्बंध लादत आहेत. आता रशियाच्या कच्च्या तेलाच्या उत्पन्नावरच घाव घालण्यात येणार आहे. अवघा युरोप रशियाकडून कच्चे तेल आणि गॅस खरेदी करतो. ही खरेदी युरोपला बंद करायची आहे. परंतू, सौदी सोबत आल्याशिवाय हे शक्य होणार नाही. हे देश भारतावरही दबाव टाकत आहेत. परंतू, भारत रशियाकडून एवढे तेल खरेदी करत नाही. रशियन तेलावर निर्बंध आणण्यात येणार असताना सौदीच्या राजाने पाश्चिमात्य देशांचे मनसुबे उधळून लावले आहेत. 

कच्च्या तेलाचे निर्यातदार असलेल्या सौदी अरेबियाने अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांचा दबाव झुगारून लावला आहे. रशियाला ओपेक प्लस देशांच्या संघटनेतून बाहेर काढणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सौदीच्या राजाने सुनावले आहे. सौदी अरेबिया रशियासोबत आपले सहकार्य सुरुच ठेवणार आहे. ओपेक प्लसमधील देश रशियासोबत काम करतील असेही म्हटले आहे. 

प्रिंस अब्दुलअजीज यांनी फायनांशिअल टाईम्सला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी ओपेकला राजकीय रंगात ओढू नका, असे म्हटले. उलट ओपेक देशांच्या या संघटनेची जगाने स्तुती करायला हवी. आम्ही एका सहकार्य करारावर काम करत आहोत, यात रशियाही सहभागी आहे, असे म्हटले आहे. ओपेक प्लस ही २४ कच्च्या तेलाचे उत्पादन घेणाऱ्या देशांची संघटना आहे. यामध्ये १४ ओपेक देश आणि रशियासह १० गैर ओपेक देश आहेत. या संघटनेची स्थापना २०१७ मध्ये करण्यात आली. कच्च्या तेलाच्या उत्पादनात समन्वय आणि जागतिक किंमती स्थिर ठेवण्यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आली होती. 

सौदी अरेबिया आणि अमेरिका हे चांगले मित्र मानले जात होते. परंतू जेव्हापासून बायडेन सत्तेचत आले तेव्हापासून या मैत्रीत कटुता आली आहे. वॉशिंग्टन पोस्टचे सौदी पत्रकार जमाल खशोग्गी यांची हत्या झाल्यावरून हा वाद सुरु झाला आहे. तेव्हापासून सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अमेरिकेच्या निशान्यावर आहेत. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाsaudi arabiaसौदी अरेबियाAmericaअमेरिका