शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: रशियन फौजा हबकल्या! युक्रेन सैन्याने अचानक पवित्रा बदलला; डोनाबास, खेरसानमध्ये घमासान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 15:09 IST

Russia Ukraine War: युक्रेनने कालच रशियन फौजांचे नुकसान किती केले याची आकडेवारी जाहीर केली होती. यामध्ये १३५०० हून अधिक रशियन सैनिकांना मारल्याचे सांगण्यात आले.

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन आठवड्यांपासून  घणघोर युद्ध सुरु आहे. रशियन सैन्याला काही केल्या युक्रेन सर करता आलेले नाही, तर युक्रेनी सैन्य एवढा चिवट प्रतिकार करत आहेत की रशियाला पुढे जाणे मुश्कील बनले आहे. आता युक्रेन सैन्याने तर पुढचा गिअर टाकला आहे. बचावाचा पवित्रा सोडून आक्रमण करण्यास सुरुवात केल्याने रशियन सैन्याची सळो की पळो परिस्थिती होण्याची शक्यता आहे. 

युक्रेनने कालच रशियन फौजांचे नुकसान किती केले याची आकडेवारी जाहीर केली होती. यामध्ये १३५०० हून अधिक रशियन सैनिकांना मारल्याचे सांगण्यात आले. याचबरोबर लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि अन्य युद्धसामुग्री मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्यात आली आहे. दोन्ही देशांदरम्यान चर्चा चौथ्या फेरीमध्ये पोहोचली आहे. या फेरीत रशिया काहीसा नरमलेला दिसत असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. 

या पार्श्वभूमीवर आज युक्रेनच्या सैन्याचा पवित्रा बदलल्याचे दिसत आहे. रशियन सैन्याच्या ताब्यात गेलेले डोनाबास शहर पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी युक्रेनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोनेत्स्क पीपुल्स रिपब्लिकने म्हटले की, डोनाबासमध्ये युक्रेनी सैनिक मोठ्या प्रमाणावर गोळीबार करत आहेत. युक्रेनकडून रशियन सैन्यावर १० मोर्टार डागल्या गेल्या आहेत. 

तर दुसरे शहर खेरसनमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावर युक्रेनच्या सैन्याने रशियन हेलिकॉप्टरवर जोरदार हल्ले चढविले आहेत. या हल्ल्याचे सॅटेलाईट फोटो देखील जारी करण्यात आले आहेत. या विमानतळावरील कमीतकमी तीन हेलिक़ॉप्टर्स उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्ध