शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: युक्रेनचा जोश पाहून रशियन सैन्याचे उडाले होश! संयम संपला, अख्खे शहर उडवून देण्याची दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 15:55 IST

Russia Ukraine War Updates: हल्लेखोर रशियाचा युक्रेन सैन्याला अल्टीमेटम! रशियन सैन्याविरोधात युक्रेनचे नागरिक आता खुलेपणे समोर येऊ लागले आहेत. Starobilsk च्या लुहान्स्कमध्ये लोकांनी रशियन फौजांचा रस्ताच ब्लॉक केला आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. गेले सात दिवस हे युद्ध सुरु आहे. पहिल्या दोन दिवसांत अख्खा युक्रेन ताब्यात घेण्याच्या इराद्याने आलेल्या रशियन सैन्याचा संयम आता सुटत चालला आहे. यामुळे रशियन सैन्याने हॉस्पिटल, नागरिकांवरही हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे युक्रेन नामोहरम होईल आणि शरणागती पत्करेल असे त्यांना वाटत आहे. परंतू युक्रेनी सैनिक रशियासोबत त्याच त्वेषाने लढत आहेत. 

रशियाने खारकीववर जोरदार हल्ला चढविला आहे. तर खेरसन हे शहर ताब्यात घेतले आहे. आता युक्रेनला झुकविण्यासाठी रशियाने युक्रेनचे एक अख्खे शहरच उडवून देण्याची धमकी दिली आहे. शरणागती पत्करा अन्यथा कोनोटॉप शहरच उडवून देऊ अशी धमकी रशियाच्या सैन्याने दिल्याचा दावा महापौरांनी केला आहे. यासाठी अल्टीमेटम देण्यात आल्याचे ते म्हणाले. 

रशियाच्या सैन्याला ना इंधन मिळत आहे ना खाण्या पिण्याच्या  वस्तू. रशियाकडून कोणताही रसद पुरविली जात नसल्याने हे सैन्य नामोहरम झाले आहे. यामुळे रशियन सैन्याने देखील अनेक ठिकाणी युद्धास नकार दिल्याचा दावा युक्रेन करत आहे. अनेकांनी सरेंडर केल्याचेही म्हटले आहे. त्यातच युक्रेनी नागरिकांनी रशियन सैन्याच्या मार्गात काटे पेरण्यास सुरुवात केल्याने ते आणखीनच बेजार झाले आहेत. 

रशियन सैन्याविरोधात युक्रेनचे नागरिक आता खुलेपणे समोर येऊ लागले आहेत. Starobilsk च्या लुहान्स्कमध्ये लोकांनी रशियन फौजांचा रस्ताच ब्लॉक केला आहे. दुसरीकडे कीववर मोठ्या प्रमाणावर बॉम्बफेक सुरु झाली आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी गेल्या सहा दिवसांत सहा हजारांहून रशियन सैनिकांना मारल्याचा दावा केला आहे. तसेच कीवपासून ३० किमी दुरवर बुचायेथे रशियन फौजांचा अख्खा जथ्थाच नेस्तनाभूत करण्यात आला आहे. सुमी येथून रशियन फौजा मागे परतू लागल्याचा दावा युक्रेनने केला आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्ध