शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: पुतीन यांना जोरदार धक्का! युक्रेनमध्ये टॉप सिक्रेट मिशनवर असलेला गुप्तहेर मारला गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 09:28 IST

Russia Ukraine War: युद्धात रशियाच्या १२ कमांडरना जीव गमवावा लागला आहे. यामध्ये रशियाचा एक गुप्तहेर देखील आहे, जो युक्रेनमध्ये एका मोठ्या सिक्रेट मिशनवर आला होता. हे मिशन काय होते, हे अद्याप कोणालाही समजलेले नाही. परंतू, त्याच्या मृत्यूमुळे पुतीन यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. 

कीव्ह: रशिया आणि युक्रनमध्ये चौथ्या टप्प्यातील चर्चा काहीशी सकारात्मक झाल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे गेल्या २१ दिवसांपासून सुरु असलेले भयंकर युद्ध थांबण्याची चिन्हे आहेत. यावरून रशिया नरमला असल्याचे बोलले जात आहे. परंतू युद्धभूमीवरील परिस्थिती फार वेगळी दिसत आहे. रशिया कीव्ह ताब्यात घेण्यासाठी जोरदार हल्ले करत आहे. या संघर्षात युक्रेनला मोठे नुकसान सोसावे लागले असले तरी रशियाचेही युक्रेनने न झुकता मोठे नुकसान केले आहे. 

या युद्धात रशियाच्या १२ कमांडरना जीव गमवावा लागला आहे. यामध्ये रशियाचा एक गुप्तहेर देखील आहे, जो युक्रेनमध्ये एका मोठ्या सिक्रेट मिशनवर आला होता. हे मिशन काय होते, हे अद्याप कोणालाही समजलेले नाही. परंतू, त्याच्या मृत्यूमुळे पुतीन यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. 

'द सन'च्या वृत्तानुसार य़ा रशियन गुप्तहेराचे नाव कॅप्टन एलेक्सी ग्लुशचक आहे. तो ३१ वर्षांचा होता. सायबेरिय़ाच्या ट्युमेनचा तो राहणारा होता. जीआरयू मिलिट्री इंटेलिजेंस स्पायमध्ये कॅप्टन पदावर होता.  ग्लुशचक हा मारियुपोलोमध्ये सुरु असलेल्या भीषण लढाईत मारला गेला. रशियाने हे गुप्त ठेवले असले तरी त्याच्यावर शासकीय इममामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

ग्लूशचकच्या या गार्ड ऑफ ऑनर देतानाचे फोटो समोर आले आहेत. महिला दिना दिवशीच त्याचा मृत्यू झाला. त्या दिवशी त्याने त्याची आई आणि पत्नीला फोन केला होता. या दोघींना त्याने महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर सायंकाळी तो हल्ल्यात ठार झाला. आता त्याला युक्रेनच्या सैन्याने मारले की रशियन सैन्याने चुकून केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला हे कालांतराने उघड होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन