शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War : रशियन सैनिकांमध्ये विद्रोह, आपल्याच कमांडरला टॅंकखाली चिरडून मारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 13:48 IST

Russia-Ukraine War : नाराज सैनिकांनी आपल्याच एका सीनिअर ऑफिसरवर राग व्यक्ती केला. एका मीडिया रिपोर्टनुसार, रशियन कर्नलला त्यांच्याच सैनिकांनी टॅंकखाली चिरडून मारलं.

रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धाला (Russia-Ukraine War) आता एक महिना झाला आहे. जसजसं युद्ध पुढे जात आहे रशियन सैनिकांचं (Russian Soldier) मानसिक स्थैर्य ढासळत आहे. त्यांना कोणत्याही स्थितीत परत जायचं आहे. बातमी तर अशीही समोर येत आहे की, नाराज सैनिकांनी आपल्याच एका सीनिअर ऑफिसरवर राग व्यक्ती केला. एका मीडिया रिपोर्टनुसार, रशियन कर्नलला त्यांच्याच सैनिकांनी टॅंकखाली चिरडून मारलं. हे कर्नल यूक्रेन युद्धात रशियन सैनिकांच्या एका युनिटचं नेतृत्व करत होते. 

‘द सन’ च्या रिपोर्टनुसार,  पश्चिम अधिकाऱ्यांनी सांगितलं की, विद्रोही सैनिकांनी आपल्या कमांडरवर ३७व्या मोटर रायफल ब्रिगेड यूरी मेदवेदेव (Yuri Medvedev) वर जाणूनबुजून टॅंक चालवला. या आठवड्याच्या सुरूवातीला समोर आलेल्या फोटोंमध्ये कर्नल मेदवेदेव यांना स्ट्रेचरवर हॉस्पिटलमध्ये नेताना दाखवण्यात आलं होतं. कमांडर यूरी कीवमध्ये मकरिवमध्ये जखमी झाले होते.

आता सैनिकांना नकोय युद्ध

रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं  आहे की, कमांडरच्या पायावरून टॅंक गेला होता. मात्र, तो वाचला. आता पश्चिमी देशांच्या अधिकाऱ्यांचं मत आहे की, गंभीर जखमांमुळे कमांडरचा मृत्यू झाला. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितलं की, ब्रिगेड कमांडर आपल्याच सैनिकांच्या हातून मारले गेले. रशियन सैनिकांना आता युद्ध लढायचं नाहीये. त्यांना घरी परत जायचं आहे. अधिकारी पुढे म्हणाले की, युद्धात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ब्रिगेडचे सैनिक विद्रोह करत आहेत आणि त्यामुळेच त्यांनी हे पाउल उचललं.

अधिकाऱ्यांनुसार, 'आम्हाला असं वाटतं की, कर्नलला त्यांच्याच सैनिकांनी मुद्दामहून मारलं. त्यांच्या सैनिकांनीच त्यांच्यावर टॅंक चढवला. यातून हे समोर येतं की, रशियन सेनेचं मनोबल ढासळलं आहे. आम्हाला तर अशी माहिती मिळाली की, अर्ध युनिट मारल्यानंतर सैनिकांनामध्ये विद्रोह दिसत आहे'.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाInternationalआंतरराष्ट्रीय