शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
4
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
5
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
6
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
7
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
8
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
9
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
10
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
11
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
12
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
13
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
14
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
15
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
16
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
17
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
18
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
19
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

Russia Ukraine War: युक्रेनचा मोठा दावा; रशियाचे 30 टँक उद्ध्वस्त, 7 एयरक्राफ्ट, 6 हेलिकॉप्टर पाडले, 25 सैनिकही सरेंडर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 10:58 IST

यूक्रेनच्या उत्तरेकडे ग्लुखोव्ह आणि पोबेडा भागांत युद्ध सुरू आहे. येथे रशियन सैन्याला अडवण्यात आले आहे. याशिवाय, चेर्निगोव्हच्या दिशेलाही बेलौस नदीच्या काठावर युक्रेनच्या सैनिकांनी रशियन सैन्याला अडवून ठेवले आहे. तसेच, युक्रेनचे सैन्य डोवझंका, खार्किव, अख्तिरका आणि सुमी भागाचे रक्षण करत आहे.

रशिया-युक्रेन युद्ध पेटले आहे. युक्रेन संपूर्ण ताकदीनिशी रशियन हल्ल्यांचा प्रतिकार करत आहे. यातच, युक्रेनच्या लष्कराचे कमांडर-इन-चीफ, व्हॅलेरी जालुझनी यांनी, आपण 30 रशियन टँक नष्ट केल्याचा, 7 विमाने आणि 6 हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला आहे. एवढेच नाही, तर 25 रशियन सैनिकांनी युक्रेनच्या सैन्यापुढे शरणागती पत्करल्याचेही जालुझनी यांनी म्हटले आहे. याच वेळी, युक्रेनचे सैन्य खेरसॉनला वाचविण्यासाठी लढत आहे, असेही ते म्हणाले.

यूक्रेनच्या उत्तरेकडे ग्लुखोव्ह आणि पोबेडा भागांत युद्ध सुरू आहे. येथे रशियन सैन्याला अडवण्यात आले आहे. याशिवाय, चेर्निगोव्हच्या दिशेलाही बेलौस नदीच्या काठावर युक्रेनच्या सैनिकांनी रशियन सैन्याला अडवून ठेवले आहे. तसेच, युक्रेनचे सैन्य डोवझंका, खार्किव, अख्तिरका आणि सुमी भागाचे रक्षण करत आहे.

युक्रेनमध्ये 137 जणांच्या मृत्यूचा दावा -रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचे 137 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर 316 जण जखमी झाले आहेत, असा दावा युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी केला आहे. रशियाविरुद्धच्या युद्धासाठी युक्रेन सैन्याची जमवाजमव करत आहे. तत्पूर्वी,  रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनला एकाकी सोडण्यात आले असल्याचेही त्यांनी म्हटले होते. या युद्ध जन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी युक्रेनच्या लष्कराने आपल्या नागरिकांना 10,000 असॉल्ट रायफल्स देखील वाटल्या आहेत.

चेर्नोबिल अणु ऊर्जा प्रकल्पावर रशियन सैन्याचा ताबा - युक्रेनचे राष्ट्रपती कार्यालयाचे सल्लागार मायखाइलो पोडोलीक यांनी गुरुवारी, रशियन सैन्याने चेर्नोबिल अणु ऊर्जा प्रकल्पावर कब्जा केल्याचे म्हटले होते. तसेच रशियाचा चेर्नोबिलवरील कब्जा हा युरोपीयन देशांसाठी मोठा धोका आहे, असेही त्यांनी म्हटले होते.

 पुतिन यांच्याविरोधात रशियातच आंदोलन -रशिया-युक्रेन युद्धाचे पडसाद संपूर्ण जगात दिसून येत आहेत. आता तर खुद्द रशियातच रशियाच्या या कारवाईचा विरोध होत आहे. या हल्ल्याविरोधात रशियाच्या वेगवेगळ्या शहरांत लोक आंदोलन करत आहेत. तसेच लोक राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या या कारवाईवर टीका करत आहेत. या हल्ल्याचा विरोध करणारे लोक रशियाची राजधानी मॉस्कोसह 53 इतर शहरांमध्ये रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत. या आंदोलकांना रोखण्यासाठी रशियन पोलीसही तयार आहेत. स्थानिक माध्यमांतील वृत्तांनुसार, अशा प्रकारे आंदोलन करणाऱ्या 1700 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.   

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाwarयुद्ध