शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine War: BIG BREAKING: पुतीन यांची युद्धाची घोषणा, यूक्रेनमध्ये कुठल्याही क्षणी शिरणार रशिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 10:07 IST

व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे, की रशिया विशेष लष्करी कारवाई सुरू करत आहे. युक्रेनचे निशस्त्रीकरण हे या कारवाईचे ध्येय आहे. युक्रेनच्या सैन्याला पुतिन यांनी शस्त्रे टाकून घरी जाण्यासही सांगितले आहे.

युक्रेन-रशिया आता युद्धाच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. एवढेच नाही, तर युक्रेन-रशिया युद्ध आता टाळता येणार नाही, असेही पुतीन यांनी म्हटले आहे.

व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे, की रशिया विशेष लष्करी कारवाई सुरू करत आहे. युक्रेनचे निशस्त्रीकरण हे या कारवाईचे ध्येय आहे. युक्रेनच्या सैन्याला पुतिन यांनी शस्त्रे टाकून घरी जाण्यासही सांगितले आहे.

हस्तक्षेप करणाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील, पुतिन यांची धमकी -युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा करतानाच पुतीन यांनी मोठी धमकीही दिली आहे. पुतीन म्हणाले, 'बाहेरून कुणीही यात ढवळाढवळ केली तर त्याला असे परिणाम भोगावे लागतील, जे त्याने यापूर्वी कधीही अनुभवलेले नसतील. सर्व प्रकारचे आवश्यक निर्णय घेण्यात आले आहेत. आशा आहे, की आपण मला ऐकले असेल.

...म्हणून ही विशेष लष्करी कारवाई सुरूआपल्या आपत्कालीन भाषणात पुतिन म्हणाले, हा वाद आमच्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्न आहे. त्यांनी (युक्रेन) लाल रेषा ओलांडली आहे. युक्रेन निओ-नाझींचे समर्थन करत आहे. यामुळे आम्ही ही विशेष लष्करी कारवाई सुरू केली आहे.रशियाने आपल्या संबोधनात युक्रेनच्या सैनिकांनाही संबोधित केले. तुमचे पूर्वज नाझींसोबत लढले. कीवच्या (युक्रेनची राजधानी) नाझींच्या आदेशाचे पालन करू नका. शस्त्रे खाली ठेवा आणि घरी जा. याच वेळी पुतीन यांनी नाटोलाही इशारा दिला. याचा (लष्करी कारवाईचा) जो परिणाम येईल, त्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही आमच्या बाजूने सर्व निर्णय घेतले आहेत, असे पुतीन म्हणाले. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाwarयुद्ध