शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वात श्रीमंत माणसाच्या मनाची उदारता; युक्रेननं विनंती केली, मस्क यांनी अंतराळातून मदत पाठवली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 17:03 IST

"एलन मस्क आपण मंगळावर घर बांधण्याचा विचार करत आहात. येथे रशिया युक्रेनवर कब्जा करत आहे..."

रशियन हल्ल्यांचा सामना करत असलेल्या युक्रेनच्या मदतीसाठी आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती धावून आली आहे. युक्रेनच्या विनंतीवरून एलन मस्क यांनी थेट अंतराळातूनच मदत पाठवली आहे. खरेतर, रशियाच्या सायबर हल्ल्यांत युक्रेनची राजधानी कीवसह पूर्व आणि दक्षिणेकडील शहरांमध्ये इंटरनेट सेवा डाउन झाली होती. यामुळे युक्रेनने मस्क यांच्याकडे मदत मागितली होती. यानंतर, मस्क यांनी लगेचच युक्रेनमध्ये स्टारलिंक सर्व्हिस अॅक्टिव्ह केली.

युक्रेनच्या नेत्यानं ट्विट करून मागीतली होती मदत -युक्रेनचे उपपंतप्रधान मायखाइलो फेडोरोव्ह यांनी एलन मस्क यांना टॅग करत, रशियाकडून आपल्यावर सातत्याने सायबर हल्ले होत आहेत. आम्हाला तत्काळ आपल्या मदतीची आवश्यकता आहे, असे ट्विट केले होते. या ट्विटमध्ये लिहिले होते, एलन मस्क आपण मंगळावर घर बांधण्याचा विचार करत आहात. येथे रशिया युक्रेनवर कब्जा करत आहे. आपले रॉकेट अवकाशातून यशस्वीपणे लँड करत आहेत. पण येथे रशियन रॉकेट सामान्य नागरिकांना निशाणा बनवत आहेत. आमची आपल्याकडे विनंती आहे, की आम्हाला युक्रेनमध्ये स्टारलिंक स्टेशन उपलब्ध करून देण्यात यावे, जेणेकरून आम्ही रशियाचा सामना करू शकू.

मस्क यांच्या मनाची उदारता -युक्रेनच्या नेत्याकडून आलेल्या या ट्विटला एलन मस्क यांनीही तत्काळ उत्तर दिले. मस्क यांनी लिहिले की, स्टारलिंक सर्व्हिस आता युक्रेनमध्ये अॅक्टिव्ह आहे. काही अन्य टर्मिनल वाटेत आहेत.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशिया