शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये आजपर्यंत २१३ मुलांचा मृत्यू; जेलेन्स्की सरकारचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 07:30 IST

युक्रेनमध्ये युद्धात मरण पावलेल्या मुलांची संख्या डोनेत्स्क भागात सर्वाधिक आहे. तिथे १२२ मुले मृत किंवा जखमी झाली आहेत.

किव्ह : रशियाने केलेल्या हल्ल्यांत आतापर्यंत युक्रेनमधील २१३ मुलांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याशिवाय ३८९ मुले जखमी झाली आहेत. ही माहिती युक्रेन सरकारने दिली आहे. 

युक्रेनमध्ये युद्धात मरण पावलेल्या मुलांची संख्या डोनेत्स्क भागात सर्वाधिक आहे. तिथे १२२ मुले मृत किंवा जखमी झाली आहेत. त्यापाठोपाठ किव्ह परिसरात ११४, खारकिवला ९१, चेर्निहिवमध्ये ६६, खेरसनमध्ये ४४, मायकोलिवला ४३, लुहान्स्कमध्ये ३७, जापोरिज्जियात २७, सुमी येथे १७, किव्ह शहरात १६, जॉइटॉमिरमध्ये १५ मुले रशियाच्या हल्ल्यांमुळे जखमी किंवा मरण पावली आहेत. मारियुपोल व अन्य ठिकाणी अडकलेल्यांपैकी लहान मुले, महिला, वयोवृद्धांची सुटका करण्याच्या मोहिमेत रशिया अडथळे आणत असल्याचा आरोप युक्रेनने केला होता. याबाबत मारियुपोलमध्ये भीषण स्थिती असल्याचे युक्रेनच्या प्रवक्त्याने सांगितले.

रशियाला हरविणे शक्य : ऑस्टिनयुक्रेनकडे योग्य लष्करी साधनसामग्री व शस्त्रास्त्रे असल्यास ते युद्धात रशियाला हरवू शकतील, असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी म्हटले आहे. या युद्धात आपण जिंकू शकतो हा विश्वास युक्रेनच्या लष्करामध्ये जागृत झाला आहे. त्यामुळे ते चिकाटीने रशियाविरोधात लढत देत आहेत. या युद्धात रशियाच्या लष्कराचेही नुकसान झाले आहे. त्याचा रशियाच्या युद्धातील कामगिरीवरही परिणाम होत आहे, असेही ऑस्टिन यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया