'दोन आठवड्यात 2 लाखांहून अधिक लोक रशियन सैन्यात सामील', संरक्षणमंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 09:28 PM2022-10-04T21:28:24+5:302022-10-04T21:28:58+5:30

Russia-Ukraine War : रशियाने युक्रेनवरील लष्करी हल्ले आणखी तीव्र केले आहेत.

russia ukraine war over 2 lakh people join russian army after putin mobilisation drive | 'दोन आठवड्यात 2 लाखांहून अधिक लोक रशियन सैन्यात सामील', संरक्षणमंत्र्यांचा दावा

'दोन आठवड्यात 2 लाखांहून अधिक लोक रशियन सैन्यात सामील', संरक्षणमंत्र्यांचा दावा

Next

रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) सुरू असलेला संघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. एकप्रकारे रशियाने युक्रेनवरील लष्करी हल्ले आणखी तीव्र केले आहेत. तसेच, युक्रेनही रशियन सैन्याविरुद्ध जोरदार लढा देत आहे. दरम्यान, रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु  (Sergei Shoigu) यांनी मंगळवारी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (President Vladimir Putin) यांनी 21 सप्टेंबर रोजी एकत्रीकरण मोहिमेची घोषणा केल्यानंतर दोन लाखांहून अधिक लोकांना रशियन सैन्यात (Russian Army) सामील करून घेण्यात आले आहे. 

सर्गेई शोइगु यांनी एका टेलिव्हिजन कार्यक्रमादरम्यान सांगितले की, आजपर्यंत दोन लाखांहून अधिक लोक सैन्यात भरती झाले आहेत. युक्रेनमध्ये मॉस्कोच्या सैन्याला पुढे नेणे हा रशियाच्या एकत्रीकरणाचा उद्देश आहे. लष्करी अपयशाच्या मालिकेनंतर याची घोषणा करण्यात आली. क्रेमलिनने एकत्रीकरणला "आंशिक" म्हटले आहे. तसेच, तीन लाख लोकांची भरती करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही म्हटले आहे. दरम्यान, भरती झालेल्यांना 80 प्रशिक्षण मैदान आणि सहा प्रशिक्षण केंद्रांवर प्रशिक्षण दिले जात आहेस, असे सर्गेई शोइगु यांनी सांगितले.

क्रेमलिनच्या एकत्रीकरणाच्या निषेधार्थ अनेक रशियन नागरिकांनी तेथून पळ काढल्याचा दावाही अशा काही अहवालांमध्ये झाला. हजारो रशियन तरुणांना देश सोडून इतर देशांमध्ये आश्रय घेण्यास भाग पाडले जात आहे. कझाकिस्तानने मंगळवारी सांगितले की, दोन आठवड्यांत 200,000 हून अधिक रशियन आमच्या सीमेत घुसले. पळ काढणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गेल्या आठवड्यात माघार घेत अधिकाऱ्यांना एकत्रीकरणासोबत सर्व चुका दुरुस्त करण्याचे निर्देश दिले.

सर्गेई शोइगु यांनी मंगळवारी लष्करी आणि नौदल कमांडर भरतीसाठी गेलेल्या लोकांना शक्य तितक्या लवकर युद्धासाठी तयार राहण्याचे आवाहन केले. त्यांनी युद्ध अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन भरती करून अतिरिक्त प्रशिक्षण घेण्याचे आवाहन केले. प्रशिक्षण आणि लढाऊ समन्वयानंतरच या लोकांना युद्धभूमीवर पाठवता येईल, असे ते म्हणाले. तसेच, सैन्य भरती केंद्रांना कोणतेही गंभीर कारण नसताना भरती झालेल्या लोकांना सोडू नका, असे आवाहन सर्गेई शोइगु यांनी केले.

Web Title: russia ukraine war over 2 lakh people join russian army after putin mobilisation drive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.