शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine War: नरेंद्र मोदी युक्रेन-रशिया युद्ध थांबवू शकतात; मेक्सिकोचा संयुक्त राष्ट्रांत प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 19:49 IST

समरकंद येथे 22 व्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीच्या निमित्ताने मोदी आणि पुतीन भेटले होते. यावेळी मोदींनी पुतीन यांना आजचे युग युद्धाचे नाही, असे समजावले होते. याचे जगाने स्वागत केले होते. 

युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरु असल्याच्या घटनेला आता सात महिने झाले आहेत. युक्रेनचा काहीच भूभाग हाती आल्याने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन नाराज आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच अण्वस्त्रांच्या वापराचे संकेत दिले होते. यामुळे अवघ्या जगाच्या चिंता वाढल्या आहेत. असे असताना युएनमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मोठा विश्वास दाखविण्यात आला आहे. 

रशिया-युक्रेनमधील युद्ध रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये एक समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मेक्सिकोने दिला आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर मध्यस्थीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पोप फ्रांसिस आणि संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांची निवड करावी असे यात म्हटले आहे. हा प्रस्तव न्यूयॉर्कमधील युक्रेनवरील संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील चर्चासत्रावर ठेवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्री मार्सेलो लुइस एब्रार्ड कैसाबोन यांनी ठेवला आहे. 

यावेळी त्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेन-रशियाचे युद्ध थांबवू शकतात, असे म्हटले आहे. मेक्सिको आपल्या शांततेच्या भूमिकेवरून असे सांगत आहे की, आंतरराष्ट्रीय समुदायाने आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व ताकदीनिशी प्रयत्न करायला हवेत. मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांचा प्रस्ताव मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो. यासाठी एक समिती स्थापन करावी, त्यात शक्य झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना, पोप फ्रान्सिस आणि गुटेरेस यांना घ्यावे, असे ते म्हणाले. 

ही वेळ युद्धाची नाही तर शांततेसाठी काम करण्याची आणि शांततेसाठी वचनबद्ध होण्याची आहे. संवाद, मुत्सद्देगिरी आणि प्रभावी राजकीय व्यक्तींचा वापर करून शांतता मिळविली जाऊ शकते. शांततेकडे गांभीर्याने पाहण्याची हीच योग्य वेळ आहे, असे कैसाबोन म्हणाले. उझबेकिस्तानमधील समरकंद येथे 22 व्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीच्या निमित्ताने मोदी आणि पुतीन भेटले होते. यावेळी मोदींनी पुतीन यांना आजचे युग युद्धाचे नाही, असे समजावले होते. याचे जगाने स्वागत केले होते. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाNarendra Modiनरेंद्र मोदीunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ