शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 00:19 IST

८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येणार असल्याची चर्चा आहे.

मॉस्को : आमचे सरकार युक्रेनच्या मुद्द्यावर चर्चेसाठी तयार आहे, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी सांगितले. यासंदर्भात चीन दौऱ्यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत व्लादिमीर पुतिन यांनी भाष्य केले. त्यामुळे ८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येणार असल्याची चर्चा आहे.

जोपर्यंत इतर देश आपले हित लक्षात ठेवतील तोपर्यंत रशिया चर्चेसाठी तयार आहे, असे व्लादिमीर पुतिन यांनी चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. आम्ही युक्रेनवर चर्चेसाठी तयार आहोत, परंतु अशा चर्चेत संघर्षात गुंतलेल्या सर्व देशांचे हित लक्षात घ्यावे लागेल, असे व्लादिमीर पुतिन म्हणाले. दरम्यान. रशियाने फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर हल्ला केला होता. 

खार्किवमध्ये परिस्थिती बिघडली, झेलेन्स्कींचे परदेश दौरे रद्द  दुसरीकडे, खार्किव प्रदेशात रशियाच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आगामी काळात सर्व विदेश दौरे रद्द केले आहेत. त्यांचे प्रवक्ते सेर्ही नायकिफोरोव्ह यांनी बुधवारी ही माहिती दिली. झेलेन्स्की या आठवड्याच्या शेवटी स्पेन आणि पोर्तुगालला भेट देणार होते. रशियाने गेल्या आठवड्यात युक्रेनचे उत्तर-पूर्वेतील दुसरे शहर खार्किव आणि आसपासच्या भागावर हल्ला सुरु केला.

विश्लेषकांनी हा हल्ला कीवसाठी युद्धातील सर्वात धोकादायक असल्याचे म्हटले आहे. मॉस्कोच्या सैन्याने या भागातील अनेक गावे ताब्यात घेतली आहेत. रशियन क्षेपणास्त्रे खार्किववर बॉम्बफेक करत आहेत. खार्किव ताब्यात घेण्यासाठी रशिया शक्यतो शहरावर हल्ले सुरू करत आहे. शस्त्रे, दारूगोळा आणि सैनिकांच्या तुटवड्याचा सामना करत असलेल्या कीवमधील लष्करी नेतृत्वाने खार्किवमधून काही सैनिकांना माघारी नेले जात असल्याचे सांगितले होते.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया