शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War : युक्रेनच्या दोन शहरांमध्ये रशियाकडून तात्पुरता युद्धविराम; नागरिकांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 14:25 IST

Russia Ukraine War Updates : जर आपल्या मागण्या मान्य केल्या तर आपण हल्ले थांबवण्यास तयार असल्याचं पुतीन यांनी यापूर्वी सांगितलं होतं.

Russia Ukraine War Updates : युक्रेनमध्ये रशियन हल्ल्याच्या (Russia Ukrraine War) दहाव्या दिवशी रशियाने तात्पुरता युद्धविराम जाहीर केला आहे. नागरिकांना बाहेर पडण्यासाठी सुरक्षित कॉरिडॉर उपलब्ध करून देणार असल्याचेही रशियाने म्हटले आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या वृत्ताची पुष्टी केली असून स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ ते ४  या वेळेत युद्धविराम घोषित करण्यात आला आहे. यावेळी नागरिकांना सुरक्षित बाहेर पडण्यासाठी रशिया युक्रेनच्या मारियुपोल आणि वोल्नोवाखा शहरांमध्ये मानवतावादी कॉरिडॉर उपलब्ध करून देणार असल्याचंही म्हटलंय. यावेळी रशिया गोळीबार थांबवेल. रशियाने नागरिकांना शहर सोडण्याचे आवाहन केले आहे.तर दुसरीकडे रशियावर निर्बंध लादणाऱ्या देशांची संख्याही वाढू लागली आहे. युक्रेनवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता सिंगापूरनेही रशियावर आर्थिक निर्बंध जाहीर केले आहेत. सिंगापूरने रशियन सेंट्रल बँक आणि काही इतर रशियन बँकांवर निर्बंध लादले आहेत. यासोबतच रशियाच्या युक्रेनमधील लष्करी कारवाईमुळे देशातील निर्यातीवरही बंदी घालण्यात आली असल्याची माहिती सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी दिली.'मागण्या मान्य करा'युक्रेनची राजधानी कीव आणि इतर प्रमुख शहरांमध्ये हवाई हल्ल्यांच्या बातम्या हा मोठा अपप्रचार असल्याचे पुतीन यांनी यापूर्वी म्हटले होते. आपल्या मागण्या मान्य झाल्या तरच युक्रेनवर चर्चा शक्य असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. युक्रेनियन बाजू आणि इतर सर्वांशी चर्चेचा पर्याय रशियासाठी खुला असल्याची पुष्टी पुतीन यांनी केली. मात्र रशियाच्या सर्व मागण्या मान्य केल्या जाण्याची अट असल्याचं क्रेमलिननं म्हटलंय.

यामध्ये प्रामुख्यानं तटस्थ आणि अण्वस्त्र नसलेला देश होणं, त्यांच्याद्वारे क्रिमियाला रशियाचा भाग मानणं आणि पूर्व युक्रेनच्या फुटीरतावादी प्रदेशांचे सार्वभौमत्व यांचा समावेश आहे. युक्रेन सरकार तर्कसंगत आणि सकारात्मक दृष्टीकोन दर्शवेल अशी आशाही यावेळी व्यक्त करण्यात आली. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन