शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War : "हे पुतिनना दाखवा"; जेव्हा गोळीबारात जखमी झालेल्या चिमुरडीला पाहून डॉक्टरचेही अश्रू झाले अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 07:54 IST

Russia Ukraine War : रशियानं युक्रेनच्या मारियुपोल शहराकडे बॉम्बचा वर्षाव केला. यामध्ये एक सह वर्षांची मुलगीही जखमी झाली.

Russia Ukraine War : युक्रेनवर रशियाचे हल्ले अद्यापही सुरू आहेत. २४ फेब्रुवारीपासून रशिया सातत्यानं युक्रेनवर हल्ले करतोय. रशियाच्या या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत अधिकृतरित्या ३५२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये. यामध्ये १६ मुलांचाही समावेश आहे. रशियानं युक्रेनच्या मारियुपोल शहराकडेही मोठ्या प्रमाणात बॉम्ब टाकले. यामध्ये एक सहा वर्षांची मुलगी जखमी झाली. तिला रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी त्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि रक्तस्त्रावही होत होता. तिच्य़ा वडिलांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.

रुग्णालयातील वैद्यकीय टीमनंही तिलसा वाचवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. तिच्या छातीवर पंप करण्यात आलं. तर दुसरीकडे तिच्या आईलाही मुलीची स्थिती पाहून अश्रू अनावर झाले होते. दरम्यान, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही पूर्ण ताकदीनीशी तिला वाचवण्याचे प्रयत्न केले. डॉक्टरांची एक टीम तिला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न करत होती. अशाच वेळी एका डॉक्टरांना तिची परिस्थिती पाहून अश्रू आणि भावना अनावर झाल्या. "हे पुतिनना दाखला, या मुलीचे डोळे पाहा," असं म्हणत त्या डॉक्टरांच्याही अश्रूंना बांध फुटला. अनेक प्रयत्न करूनही डॉक्टर त्या मुलीला वाचवू शकले नाहीत. उपचारादरम्यान, त्या चिमुरडीनं जगाचा निरोप घेतला.

गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये चर्चा केली जाईल, असं रविवारी समोर आलं होतं. रशियानं युक्रेनला चर्चेचा प्रस्ताव दिल्याचं म्हटलं गेलं होतं. तसंच बेलारुसमध्ये येऊन चर्चेचा प्रस्ताव युक्रेनमध्ये ठेवण्यात आला होता. रशियाचा हा प्रस्ताव युक्रेननं धुडकावला. तसंच बेलारुसमध्ये चर्चा केली जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. युक्रेननंही चर्चेसाठी काही शहरांची नावं दिलं. परंतु सध्या दोन्ही देशांमध्ये कोणतीही चर्चा होऊ शकली नाही.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाhospitalहॉस्पिटलVladimir Putinव्लादिमीर पुतिन