शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine war: युद्धादरम्यान टेन्शन वाढलं, बायडेन यांच्याकडून पुतिन यांचा 'वॉर क्रिमिनल' उल्लेख; रशिया म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 08:28 IST

Russia-Ukraine war: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचा 'वॉर क्रिमिनल' असा उल्लेख केल्यानं रशियानं संताप व्यक्त केला आहे.

Russia-Ukraine war: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान अमेरिकेनं केलेल्या एका वक्तव्यावरून रशियानं संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (America Joe Biden) यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Russia Vladimir Putin) यांच्याविरोधात केलेलं वक्तव्य हे अस्वीकार्य आणि अक्षम्य असल्याचं पुतीन यांचं कार्यालय क्रेमलिननं (Kremlin) म्हटलं आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पुतीन यांना गुन्हेगाराच्या रुपात सांगणं हे अस्वीकार्य आणि अक्षम्य वक्तव्य असल्याचं क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी म्हटलं. रॉयटर्सनं टॅस न्यूज एजन्सीच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलंय.

अमेरिकेत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना बायडेन यांनी पुतीन एक युद्धाचे गुन्हेगार असल्याचं वक्तव्य केलं. यापूर्वी अनेकदा युक्रेनवरील हल्ल्यावरून अमेरिकेनं रशियाला इशारा दिला होता. "आम्ही रशियावर आर्थिक दबाव वाढवण्यासाठी आणि रशियाला आंतरराष्ट्रीय मंचावर वेगळं पाडण्यासाठी सक्षम आहोत. अमेरिकन पायलट आणि अमेरिकन लष्करी विमानं टँकसहित रवाना होत आहेत," असं यापूर्वी बायडेन म्हणाले होते. तसंच जी-७ देश कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जापान, ब्रिटन, अमेरिकेनं रशियावर निर्बंध लादण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली असल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं. 

स्लोव्हाकिया मदतीसाठी पुढेरशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या हल्ल्यादरम्यान, युक्रेनच्या मदतीसाठी आता स्लोव्हाकियाही पुढे आला आहे. स्लोव्हाकिया युक्रेनला सोव्हिएत बनावटीची S-300 मिसाइल सिस्टम देण्यास तयार असल्याची माहिती समोर आली आहे. ही मिसाईल सिस्टम देण्यापूर्वी यावर NATO ची मंजुरी आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं.

याशिवाय आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचं अमेरिकेनं स्वागत केलं आहे. रशियन सरकारनं आंतराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करावा आणि अस्थायी उपाययोजनांचं पालन करण्याचं आवाहन करत असल्याचं युएस डिपार्टमेंट ऑफ स्टेटचे नेड प्राइस यांनी सांगितलं. तसंच आपण युक्रेनसोबत असल्याचेही ते म्हणाले. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडनVladimir Putinव्लादिमीर पुतिन