शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: झेलेन्स्कींनी तडकाफडकी राजीनामा दिला तर...; युक्रेनमध्ये नव्या युद्धाला सुरुवात होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 17:10 IST

Russia Ukraine War: रशियाला जमिनीवरील सत्य माहीत नाही, त्यांचे सरकार सत्यापासून खूप दूर चालले आहे. आता युक्रेनचे लोक हातात शस्त्र घेण्यास तयार आहेत हे रशियाला कळत नाहीय.

युक्रेन आणि रशियामध्ये सुरु झालेले युद्ध जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने नेऊ लागले आहे. रशियाने अणुबॉ़म्ब टाकण्याची भाषा केली आहे. तर प्रत्यक्षात रशियन फौजांना मूठभर असलेल्या युक्रेनी सैन्याने नामोहरम करून सोडले आहे. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार रशियाला जबर धक्का बसला आहे. रशियाचा महत्वाचा जनरल मेजर युक्रेनमध्ये मारला गेला आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांचा राजीनामा मागितला आहे. असे झाले तर काय? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. 

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियन हल्ल्यांना सडेतोड उत्तर देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे आज दोन्ही देशांमधील चर्चेची दुसरी फेरी बेलारूसच्या ओब्लास्टमध्ये होणार आहे. जर युद्धाची अशीच परिस्थिती राहिली आणि झेलेन्स्की यांनी राजीनामा दिला तर युक्रेनमध्ये नवे गृह युद्ध सुरु होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

युक्रेनचे फरार माजी राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर फेडोरोविच यानुकोविचला युक्रेनचा पुन्हा राष्ट्राध्यक्ष करण्याचा रशियाने आखल्याचे समोर येत आहे. व्हिक्टर यांना २०१४ मध्ये युक्रेनमध्ये झालेल्या क्रांतीमुळे पायऊतार व्हावे लागले होते. त्यांना  देश सोडून रशियात शरण घ्यावी लागली. व्हिक्टर सध्या रशियाच्या मिन्स्कमध्ये लपलेले आहेत. झेलेन्सी यांना हटवून यानुकोविचला युक्रेनचा पुन्हा राष्ट्राध्यक्ष केले तर युक्रेवनमध्ये यादवी सुरु होण्याची शक्यता आहे. यावर युक्रेनचे राजकीय तज्ज्ञ Oleksiy Haran यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी झेलेन्स्की खूप प्रसिद्ध आहेत. जनतेत त्यांची लोकप्रियता खूप आहे. ९० टक्के लोकांना ते आवडतात. तर त्यांच्या सांगण्यावरून ८५ टक्के लोकांनी रशियाविरोधात लढण्यासाठी हातात शस्त्रे घेतली आहेत. 

रशियाला जमिनीवरील सत्य माहीत नाही, त्यांचे सरकार सत्यापासून खूप दूर चालले आहे. आता युक्रेनचे लोक हातात शस्त्र घेण्यास तयार आहेत हे रशियाला कळत नाहीय. युक्रेनच्या लोकांनी चोख प्रत्युत्तर द्यायचे ठरवले आहे. अशा स्थितीत गृहयुद्धाचा प्रश्नच उद्भवत नाही आणि अशाने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष बदलता येणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन