शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: रशियाची हकालपट्टी करा किंवा तुम्हीच बरखास्त व्हा, जेलेन्स्कींनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 07:30 IST

Russia Ukraine War: एक तर रशियाची हकालपट्टी करा किंवा संपूर्ण सुरक्षा परिषदच बरखास्त करा, असा देश सुरक्षा परिषदेचा सदस्य असून तुमच्या नाकावर टिच्चून अत्याचार करीत असल्याचे खडे बाेलही जेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्रांना सुनावले.

कीव्ह : रशियाकडून युक्रेनमध्ये भीषण नरसंहार करण्यात येत  असून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतून रशियाची हकालपट्टी करण्याची जाेरदार मागणी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वाेलाेदिमीर जेलेन्स्की यांनी केली आहे. एक तर रशियाची हकालपट्टी करा किंवा संपूर्ण सुरक्षा परिषदच बरखास्त करा, असा देश सुरक्षा परिषदेचा सदस्य असून तुमच्या नाकावर टिच्चून अत्याचार करीत असल्याचे खडे बाेलही जेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्रांना सुनावले.जेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत आभासी पद्धतीने भाषण केले. त्यावेळी युक्रेनमध्ये झालेल्या अत्याचारांकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधताना ते म्हणाले, की दुसऱ्या जागतिक युद्धानंतरचे सर्वाधिक भीषण युद्धगुन्हे युक्रेनमध्ये घडत आहेत. जास्तीत जास्त नागरिक मारल्या जातील, अशी परिस्थिती रशियन सैनिक तयार करीत आहेत. नागरिकांना रणगाड्यांखाली चिरडले जाते, महिलांना त्यांच्या मुलांसमाेरच बलात्कार करून ठार मारण्यात येत आहे. रशियन सैन्याने बुकामध्ये जे केले ते केवळ क्राैर्य आहे. 

महापाैरांसह संपूर्ण कुटुंब संपविलेमाेतीझिन शहराचे महापाैर व त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांना रशियन सैन्याने ठार केल्याचे समाेर आले आहे. हात बांधलेल्या अवस्थेत त्यांचे मृतदेह आढळून आले आहे. याशिवाय सुमी शहरामध्येही अनेकजणांचे मृतदेह आढळले आहेत. या सर्व नागरिकांना ठार मारण्यापूर्वी त्यांचा अताेनात छळ करण्यात आला हाेता. दरम्यान, रशियाने मायकाेलाईव्हमध्ये पुन्हा हल्ला केला.  

चिमुकलीच्या पाठीवर लिहिले नाव आणि नंबरयुक्रेनमध्ये एका लहान मुलीचे हृदय पिळवटून टाकणारे चित्र समाेर आले आहे. वेरा मकाेवी असे या मुलीचे नाव आहे. तिच्या पाठीवर मुलीचे नाव व नंबर लिहून ठेवला आहे.रशियाच्या हल्ल्यात मी ठार झाले तर मुलीला काेणाकडे साेपवावे, याबाबत मदत करणाऱ्यांना माहिती असेल, असे तिची आई साशा मकाेवी यांनी साेशल मीडियावर पाेस्ट केले आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ