शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine War Crisis: रशियाच्या आक्रमणानंतर अमेरिकेच्या वेगवान हालचाली, जो बायडनही लागले कामाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 12:21 IST

युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा करत पुतिन यांनी या प्रकरणात कोणीही हस्तक्षेप करू नये, अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकीही दिली.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव आता अधिकच चिघळला आहे. गुरुवारी रशियाने युक्रेनशी युद्ध सुरू केले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली. एवढेच नाही, तर युक्रेन-रशिया युद्ध आता टाळता येणार नाही, असेही पुतीन यांनी म्हटले आहे. दरम्यान, रशियाने लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर युक्रेनमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनची राजधानी कीववर क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यानंतर, अमेरिकेनंही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा करत पुतिन यांनी या प्रकरणात कोणीही हस्तक्षेप करू नये, अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकीही दिली. मात्र, रशियाच्या या इशाऱ्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट करत, या नरसंहाराला केवळ रशियाच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. ''या युद्धासाठी जग रशियालाच जबाबदार ठरवेल, या युद्धातून होणाऱ्या विनाशाला रशिया एकटाच कारणीभूत असणार आहे. या विनाशातू होणाऱ्या मृत्यू आणि नुकसानीची जबाबदारी रशियाची आहे. अमेरिका आणि अमेरिकेचे मित्र एकत्र येऊन यास प्रत्युत्तर देणार'', असल्याचेही जो बायडन यांनी म्हटलं आहे. तसेच, जी-7 ची बैठकही बोलविण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

युक्रेननं विमानतळं केली बंद

रशियन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनने आपली काही विमानतळे बंद केली आहेत. रशियासोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे युक्रेन सरकारने पूर्व युक्रेनमधील विमानतळे मध्यरात्रीपासून सकाळी 7 वाजेपर्यंत (स्थानिक वेळेनुसार) बंद केले आहेत. अधिकार्‍यांनी काही हवाई भागांना ‘डेंजर झोन’ म्हणूनही घोषित केले आहे. पुतीन यांच्या आदेशानंतर युक्रेननंही प्रत्युत्तर दिलंय. 

आम्ही बचाव करू आणि जिंकू - युक्रेन

'युक्रेन स्वतःचा बचाव करेल आणि जिंकेल. पुतिन यांनी आदेशाने रशियाने नुकतेच युक्रेनवर आक्रमण सुरू केले आहे. सध्या शांततापूर्ण युक्रेनियन शहरे दडपणाखाली आहेत, हे आक्रमकतेचे युद्ध आहे. जग पुतीनला थांबवू शकते आणि थांबवूच शकते. मात्र, आता कारवाई करण्याची वेळ आली आहे, असे युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाJoe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाVladimir Putinव्लादिमीर पुतिन