शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine War Crisis: रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेननेही बाह्या सरसावल्या, परराष्ट्रमंत्र्यांचं जगाला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 10:18 IST

दुसरीकडे युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही जगभरातील देशांना आवाहन केलं आहे.

रशिया आणि युक्रेन आता युद्धाच्या अगदी जवळ पोहोचल्याचे दिसत आहे. फुटीरतावाद्यांच्या ताब्यात असलेल्या पूर्व युक्रेनमधील डोनेत्स्क शहरात गुरुवारी पहाटे किमान पाच स्फोट झाल्याचे वृत्त आहे. यानंतर लष्कराचे चार ट्रक घटनास्थळी रवाना झाले आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. त्यातच, रशियाचेपंतप्रधान व्लादीमीर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश रशियन आर्मीला दिले आहेत. त्यामुळे, या युद्धाची ठिणगी पडल्याचे दिसून येते. दुसरीकडे युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही जगभरातील देशांना आवाहन केलं आहे.

महत्वाचे म्हणजे, संभाव्य रशियन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनने आपली काही विमानतळे बंद केली आहेत. रशियासोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे युक्रेन सरकारने पूर्व युक्रेनमधील विमानतळे मध्यरात्रीपासून सकाळी 7 वाजेपर्यंत (स्थानिक वेळेनुसार) बंद केले आहेत. अधिकार्‍यांनी काही हवाई भागांना ‘डेंजर झोन’ म्हणूनही घोषित केले आहे. पुतीन यांच्या आदेशानंतर युक्रेननंही प्रत्युत्तर दिलंय. 

'युक्रेन स्वतःचा बचाव करेल आणि जिंकेल. पुतिन यांनी आदेशाने रशियाने नुकतेच युक्रेनवर आक्रमण सुरू केले आहे. सध्या शांततापूर्ण युक्रेनियन शहरे दडपणाखाली आहेत, हे आक्रमकतेचे युद्ध आहे. जग पुतीनला थांबवू शकते आणि थांबवूच शकते. मात्र, आता कारवाई करण्याची वेळ आली आहे, असे युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे. 

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं बोलावली आपत्कालीन बैठक - एएफपी वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे, की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तीन दिवसांत दुसऱ्यांदा आपत्कालीन सत्र बोलावले आहे. यात युक्रेन संकटावर चर्चा होणार आहे. सीमेवर रशियन सैन्याची तैनाती सुरू आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, कीवच्या विनंतीवरून ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

लष्कराचे दोन ताफे डोनेत्स्कच्या दिशेने गेल्याचा दावा -दोन रशियन लष्करी ताफे बुधवारी पूर्व युक्रेनच्या अशांत डोनेत्स्कडे जात असल्याचा दावा करण्यात आला होता. एवढेच नाही, तर बुधवारी काही प्रसारमाध्यमांनी प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने, आधुनिक लष्करी सामग्रीसह सज्ज असलेले दोन ताफे डोनेत्स्कच्या दिशेने वेगाने जात आहेत, असे म्हटले होते. मात्र, या ताफ्यांमधील लष्करी वाहनांवर कोणत्याही देशाचे चिन्ह नाही, असा दावाही प्रत्यक्षदर्शिंनी केला आहे.

रशियाने नुकतेच पूर्व युक्रेनमधील लुहान्स्क आणि डोनेत्स्क भागांना स्वतंत्र देश म्हणून घोषित केले आहे आणि तेथे आपले सैन्य पाठविण्याचे आदेशही दिले आहेत. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाprime ministerपंतप्रधानwarयुद्ध