शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Russia Ukraine War: युक्रेनच्या बाजूनं ब्रिटनची युद्धात उडी? रशियानं राजदूताला बोलावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 16:58 IST

क्रिमियामध्ये रशियाच्या ब्लॅक सी आरमारावर युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात ब्रिटिश नौदलाचे जवान सहभागी होते, असा दावा मॉस्कोने केला आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यात साधारणपणे गेल्या आठ महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. मात्र, अद्याप कुणीही हार मानलेली नाही. पश्चिमेकडील देश युक्रेनच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. यामुळे पुतिन त्यांच्यावर सातत्याने निशाणा साधत आहेत. यातच, रशियाने गुरुवारी ब्रिटनच्या राजदूताला बोलावून निषेध व्यक्त केला आहे.

महत्वाचे म्हणजे, क्रिमियामध्ये रशियाच्या ब्लॅक सी आरमारावर युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात ब्रिटिश नौदलाचे जवान सहभागी होते, असा दावा मॉस्कोने केला आहे. राजदूत डेबोरा ब्रोनर्ट हे स्थानिक वेळेनुसार 10:30 (0730 GMT) वाजता परराषट्रमंत्रालयात पोहोचले. यावेळी काही लोकांनी ब्रिटन विरोधात घोषणा बाजीही केली. एवढेच नाही, तर त्यांनी 'ब्रिटन एक दहशतवादी देश आहे' सारख्या घोषणा लिहिलेले फलकही धरले होते.

30 मिनिटे मंत्रालयात होत्या राजदूत - ब्रोनर्ट जवळपास 30 मिनिटे मंत्रालयात होत्या. मात्र, यावर अद्याप रशिया अथवा ब्रिटनकडून कसल्याही प्रकारचे भाष्य करण्यात आलेले नाहीत. रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ता मारिया जखारोव्हा यांनी बुधवारीच, क्रिमियावरील शनिवारच्या ड्रोन हल्ल्यासंदर्भात राजदूतांना बोलावण्यात येईल, असे म्हटले होते. रशियाने 2014 मध्ये क्रिमियाला युक्रेनपासून वेगळे केले होते. मात्र, ब्रिटनने आपल्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. 

याशिवाय, ब्रिटन पश्चिमेकडील एक घातक शक्ती असल्याचे रशिया ने म्हटले आहे. एवढेच नाही, तर रशिया नष्ट करण्याचा आणि आपली विशाल नैसर्गिक संसाधने बळकवण्याचा ब्रिटनचा कट आहे, असे साष्ट्रपती पुतीन यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाEnglandइंग्लंडrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन