शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

Russia Ukraine War: रशियाच्या भीषण गोळीबारात अमेरिकन पत्रकाराचा मृत्यू, कोण होते ब्रेंट रेनॉड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 12:55 IST

Russia Ukraine War: ब्रेंट रेनॉड रशियाच्या हल्ल्यात बेघर झालेल्या युक्रेनच्या निर्वासितांवर डॉक्युमेंट्री बनवत होते.

कीव: रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात (Russia-Ukraine Crisis) रशियाच्या हल्ल्यात अमेरिकेतील पत्रकार आणि डॉक्युमेंट्री फिल्म मेकर ब्रेंट (Brent Renaud) रेनॉडचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ब्रेंट यांच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. ब्रेंट रेनॉड एक हुशार पत्रकार, चित्रपट निर्माता आणि फोटो जर्नलिस्ट होते. ब्रेंट यांनी त्यांचा भाऊ क्रेगसोबत मिळून एचबीओ आणि वाइस न्यूजसाठी अनेक माहितीपटांची निर्मिती केली आहे.

2009 मध्ये ब्रेंटने त्याच्या भावासोबत 'वॉरियर चॅम्पियन्स: फ्रॉम बगदाद टू बीजिंग' (Warrior Champions: From Baghdad to Beijing) हा माहितीपट बनवला होता. रिपोर्ट्सनुसार ब्रेंट न्यूयॉर्क टाइम्ससाठी काम करत होते. 13 मार्च 2022 युक्रेनच्या निर्वासितांवर एक रिपोर्ट तयार करण्यासाठी ब्रेंट आले होते, यादरम्यान, रशियाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. 

स्वतःच्या जबाबदारीवर युक्रेनमध्ये आले होते 50 वर्षीय ब्रेंट रेनॉड आर्कान्सासमचे रहिवासी होते. ब्रेंट अतिशय हट्टी स्वभावाचे होते, म्हणूनच ते स्वतःच्या जबाबदारीवर युक्रेनला आले होते. त्यांना ते काम करत असलेल्या कंपनीने युक्रेनमध्ये न जाण्याचा सल्ला दिला होता, पण हट्टी ब्रेंटने निर्वासितांवर विशेष अहवाल बनवण्यासाठी युक्रेनमध्ये येण्याचे ठरवले. दरम्यान, ब्रेंट यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. 

असा झाला ब्रेंट यांचा मृत्यू?गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांनी प्राण गमावले आहेत. सैनिकांपासून सर्वसामान्यांपर्यंत मारले गेले आहेत. ब्रेंट रेनॉड युक्रेनियन निर्वासितांचे चित्रीकरण करत होते. रविवारी युक्रेनमधील इरपिनमध्ये रशियन लष्कराने गोळीबार केला होता, त्यादरम्यान ब्रेंटच्याही मृत्यूची बातमी समोर आली होती. ब्रेंट यांच्या कारवर अंदाधुंद गोळीबार झाला, यात ब्रेंटचा मृत्यू झाला तर पत्रकार जुआन अरेडोंडो (Juan Arredondo) गंभीर जखमी झाले. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाAmericaअमेरिकाJournalistपत्रकार