शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Narendra Modi Joe Biden : "भारत आपले निर्णय स्वत:च घेईल, परंतु...;" मोदी-बायडेन चर्चेनंतर अमेरिकेचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 15:27 IST

Narendra Modi Joe Biden : आपण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांना थेट चर्चेबद्दल सुचवलं होतं असंही मोदींनी यादरम्यान सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (America Joe Biden) यांनी सोमवारी आभासी शिखर परिषदेत रशिया युक्रेन युद्धावर (Russia Ukraine War) चर्चा केली. या संकटावर भारत आपला निर्णय स्वत:च घेईल असं अमेरिकनं म्हटलं. दरम्यान, भारतानं रशिया आणि चीनमधील वाढते संबंध पाहिलेज तर स्पष्टपणे त्यांचे विचार प्रभावित होतील, असंदेखील अमेरिकेनं म्हटलं. दरम्यान, आपण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russia Vladimir Putin) आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की (Ukraine Volodymyr Zelensky) यांना थेट चर्चेबद्दल सुचवलं होतं, असंही पंतप्रधान मोदींनी यादरम्यान सांगितलं.

चर्चेदरम्यान युक्रेनमधील बुचा येथे झालेल्या नरसंहाराबाबत पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला. "बुचा शहरात निर्दोष नागरिकांची झालेली हत्या चिंताजनक होती. आम्ही याची निंदा केली आणि निष्पक्ष तपासाची मागणी केली. आम्ही युक्रेनमधील लोकांच्या संरक्षणावर आणि त्यांना मानवतावादी मदतीचा अखंड पुरवठा करण्यावर भर दिला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मी वॉशिंग्टनला आलो होतो, तेव्हा तुम्ही म्हणाला होता की भारत-अमेरिका भागीदारी अनेक जागतिक समस्यांच्या निराकरणासाठी हातभार लावू शकते," अशी आठवणही त्यांनी यावेळी काढली.

"भारतावर दबाव टाकला का?""मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि जुन्या लोकशाहीच्या रुपात आपण स्वाभाविकच भागीदार आहोत," असं मोदी म्हणाले. यानंतर आयोजित एका पत्रकार परिषदेत भारतावर एका बाजूनं निर्णय घेण्यास दबाव टाकला का? असा प्रश्न विचारण्यात आला. "भारत आपले निर्णय स्वत: घेईल. परंतु चर्चा कायम सुरू राहील," असं उत्तर देताना बायडेन म्हणाले.

"आम्हाला माहितीये की भारताला रशिया आणि चीन यांच्यातील संबंधांची चिंता आहे. भारत नियंत्रण रेषेवर अतिशय तणावपूर्ण स्थितीचा सामना करत आहे. हे भारताच्या विचारांना प्रभावित करणारा आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJoe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाIndiaभारतRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया