शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Vladimir Putin: शक्तीशाली पुतीन यांच्यावर अर्धनग्न महिलेने केला होता हल्ला; तीच संघटना आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 15:37 IST

Vladimir Putin: एका अर्धनग्न अवस्थेतील तरुणीने जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक असलेल्या व्लादिमीर पुतिन यांना सर्वांसमोर 'हुकूमशहा' म्हटले होते.

मॉस्को: युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची जगभर चर्चा आहे. पण, एकेकाळी या जगातील जगातील सर्वात शक्तिशाली नेत्याला सर्वांसमोर एका अर्धनग्न तरुणीने 'हुकूमशहा'(डिक्टेटर) म्हटले होते. विशेष म्हणजे, यावेळी पुतिन यांच्यासोब जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यादेखील होत्या. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर जगभरात या फोटोची बरीच चर्चा झाली होती. 

8 एप्रिल 2013 रोजी ही घटना घडली होती. जर्मनीतील हॅनोव्हर शहरात 'हॅनोव्हर मेसे' या औद्योगिक प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा सुरू होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन विशेष पाहुणे म्हणून आले होते. त्यांच्यासोबत जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केलही होत्या. विशेष बाब म्हणजे त्यावेळी या प्रदर्शनात 100 हून अधिक रशियन कंपन्या सहभागी झाल्या होत्या.

तरुणी 'फेमेन' ग्रुपची सदस्यपुतिन यांच्यासमोर अर्धनग्न अवस्थेत आलेल्या तरुणीचे नाव अलेक्झांड्रा शेवचेन्को असे आहे. ती युक्रेनमधील 'फेमेन' या संघटनेशी संबंधित होती. ही संघटना महिलांच्या हक्कांसाठी आंदोलन करते. हा ग्रुप अजूनही सक्रिय असून, युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करत आहेत. 

द गार्डियनशी झालेल्या संभाषणात ती तरुण शेवचेन्कोने या घटनेबद्दल सांगितले - 'मी दुरुनच सूट घातलेल्या पुरुषांचा समूह पाहिला. मी त्यांच्याजवळ गेल्यावर मला पुतिन दिसले. त्यांना पाहताच मला समजले की, ही चांगली संधी आहे. मला ही संधी जाऊ द्यायची नव्हती, म्हणून मी कुंपणावरुन उडी मारली, कपडे काढून पुतिनकडे धावले आणि 'हुकूमशहा' असे ओरडले. तिथे उपस्थित फोटोग्राफर्सनी ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. बर्‍याच रिपोर्ट्समध्ये या फोटोचे वर्णन 2013 मधील सर्वात खास फोटो म्हणून करण्यात आले होते.

युक्रेन हल्ल्याचा अनेक ठिकाणी निषेध6 मार्च 2022 रोजी या गटातील 50 मुली आयफेल टॉवरजवळ अर्धनग्न अवस्थेत पोहोचल्या होत्या. त्याआधीही स्पेनमधील माद्रिद शहरात मुलींनी अशाच प्रकारचा निषेध केला होता. 3 मार्च 2022 रोजीही त्यांनी रशियन दूतावासाबाहेर अर्धनग्न उवस्थेत आंदोलन केले होते, त्यावेळी त्यांच्या उघड्या शरीरावर 'पीस फॉर युक्रेन' असे लिहीले होते. 'फेमेन' ही संस्था जगातील अनेक देशांमध्ये कार्यरत आहे. आणि त्याचे सदस्य वेगवेगळ्या स्त्रीवादी मोहिमा करत राहतात. 

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया