शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine War: यूक्रेनचा दावा- 'एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यासह रशियाचे अनेक सैनिक मारले गेले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 14:30 IST

Russia-Ukraine War: युक्रेन्या दाव्यानुसार, त्यांनी रशियाच्या सेंट्रल मिलिटरी डिस्ट्रिक्टच्या 41व्या संयुक्त सशस्त्र दलाचे उप कमांडर मेजर जनरल आंद्रे सुखोवेत्स्की यांना मारले आहे.

कीव: गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस अधिक भीषण होत आहे. दरम्यान, रशियाला मोठा धक्का बसल्याची बातमी समोर आली आहे. युक्रेनने केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी रशियाच्या सेंट्रल मिलिटरी डिस्ट्रिक्टच्या 41व्या संयुक्त सशस्त्र दलाचे उप कमांडर मेजर जनरल आंद्रे सुखोवेत्स्की यांना मारले आहे.

युक्रेनची राजधानी कीवमध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान युक्रेनच्या लष्कराला हे यश मिळाले आहे. रशियासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे, मात्र रशियाने याला दुजोरा दिलेला नाही. युक्रेनने देखील मोठ्या संख्येने रशियन सैनिक मारले असल्याचे सांगितले आहे, परंतु रशियन बाजूने कोणतीही पुष्टी झालेली नाही. ब्रिटनचे वृत्तपत्र 'मेल ऑनलाइन'च्या वृत्तानुसार, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सुखोवेत्स्कीच्या मृत्यूची पुष्टी केली नाही. मात्र त्यांचे सहकारी लष्करी अधिकारी सर्गेई चिपिलिओव्ह यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. 

मेजर जनरल सुखोवेत्स्की यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार होऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, युद्ध सुरू झाल्यापासून रशिया आतापर्यंत आपल्या सैनिकांच्या हौतात्म्याचा इन्कार करत आला आहे. मात्र, एक दिवस आधी त्यांनी कबूल केले होते की, आतापर्यंत त्यांचे 498 जवान शहीद झाले आहेत, तर 1600 जखमी झाले आहेत. तर, युक्रेनच्या लष्कराने दावा केला आहे की, त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या जवळपास 9,000 सैनिकांना ठार केले आहे. पण, या आकडेवारीची पुष्टी करणे कठीण आहे.

सुखोवोत्स्की हे गेल्या वर्षीच डेप्युटी आर्मी कमांडर झालेसुखोवोत्स्की हे रशियन सैन्यात अत्यंत प्रभावशाली अधिकारी होते. ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांना 41व्या तुकडीचे उप आर्मी कमांडर बनवण्यात आले. याआधी ते नोव्होरोसिस्कमधील 7व्या एअरबोर्न असॉल्ट डिव्हिजनचे 3 वर्षे कमांडर होते. सीरिया, चेचन्या आणि अबखाझिया येथील अनेक लढायांमध्ये त्यांनी रशियन सैनिक आणि लढवय्यांचे आघाडीवर नेतृत्व केले होते. त्यांना ऑर्डर ऑफ मिलिटरी मेरिट आणि मेडल ऑफ करेज यासारख्या सर्वोच्च शौर्य पदकांनीही त्यांचा गौरव करण्यात आले.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन