शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine: स्मार्टफोन बनला रशियन सैनिकांचा काळ, शेकडो जणांचा झाला मृत्यू, धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 17:19 IST

Russia-Ukraine War: आता युद्धामध्ये स्मार्टफोन वापरण्याचा नवा धोका समोर आला आहे. सैनिकांचा प्रत्येक फोन कॉल, टेक्स्ट मेसेज किंवा सोशल मीडियावर सक्रिय राहिल्याने असा सैनिकांना लक्ष्य करणे शत्रूसैन्याला लक्ष्य करण्यास मदत मिळले.

स्मार्टफोन जगभरातील अनेक सामाजिक समस्यांसाठी कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. किशोरवयीन मुलांचा एकाकीपणा, रस्ते अपघात तसेच अनेक प्रकारच्या आजारपणांसाठी कारणीभूत ठरत असल्याचा दावा करण्यात येत असतो. मात्र आता युद्धामध्येस्मार्टफोन वापरण्याचा नवा धोका समोर आला आहे. सैनिकांचा प्रत्येक फोन कॉल, टेक्स्ट मेसेज किंवा सोशल मीडियावर सक्रिय राहिल्याने असा सैनिकांना लक्ष्य करणे शत्रूसैन्याला लक्ष्य करण्यास मदत मिळले. याचं ताजं उदाहरण रशिया आणि युक्रेनच्या युद्धामधून दिसून आलं आहे.

नववर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी २०२३ रोजी मकिव्हमधील एका बराकीला केवळ एका रॉकेटने लक्ष्य करण्यात आले. त्यात शेकडो रशियन सैनिकांचा मृत्यू झाला, असा दावा युक्रेनने केला आहे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर सैनिकांना युक्रेनने कसे काय मारले? असा प्रश्न  रशियन नागरिक अधिकारी आणि रशियन मीडियाला विचारत आहेत. दरम्यान, याचं अधिकृत उत्तर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलं आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, हे सैनिक अधिकृत निर्बंधांचं उल्लंघन करून मोबाईल फोनचा वापर करत होते. त्यामुळे युक्रेनला त्यांचे लोकेशन समजले आणि त्यांनी या सैनिकांना लक्ष्य केले.

रशियन सैनिक गेल्या वर्षी युक्रेनमध्ये घुसल्यापासून मोबाईल फोन्सचा वापर फोन लावण्यासाठी करत होतेच. त्याचबरोबर सातत्याने इंटरनेटचा वापर करू सोशल मीडियावरही सक्रिय होते. यामुळे रशियन सैनिकांसमोर ही समस्या निर्माण झाली हे. मात्र केवळ रशियनच नाही तर संपूर्ण जगातील सैन्यदले या समस्येचा सामना करत आहेत. युद्धादरम्यान रशियन सैन्य असुरक्षित कम्युनिकेशनवर अधिक विसंबून असल्याची माहिती समोर आली होती. मात्र बहुतांश रशिनय युनिट्सकडे सुरक्षित रेडिओ इक्विपमेंट होते. तरीही बहुतांश सैनिक हे संभाषणासाठी खासगी फोनचा वापर करत होते. युक्रेनमध्ये घुसल्यानंतरही ही प्रक्रिया सुरू होती.

युक्रेनच्या अधिकाऱ्यांना रशियन सैनिक हे खासगी फोन वापरत असल्याची कुणकुण लागल्यानंतर त्यांनी आपल्या देशातील नेटवर्कमधून रशियाचे नंबर्स बंद केले. त्यानंतर अनेक रशियन सैनिकांनी युक्रेनच्या लोकांचे फोन हिसकावून ते वापरण्यास सुरुवात केले. त्यामुळे युक्रेनच्या सैन्याला रशियन सैन्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष देणे सोपे झाले आहे. काही प्रकरणात युक्रेनने रशियन सैनिकांच्या कॉल्सवर झालेलं संभाषण सोशल मीडियावर शेअर केलं. त्यामुळे त्यांची रणनीती उघड होऊ लागली.   

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धSmartphoneस्मार्टफोन