शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: UNSCच्या बैठकीत युक्रेन-रशिया युद्धावर चर्चा; भारताने केले युद्ध थांबवण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 08:38 IST

Russia Ukraine War: संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती म्हणाले, 'भारत युद्ध थांबवण्याच्या बाजूने आहे, पंतप्रधानांनी पुन्हा एकदा दोन्ही बाजूंच्या नेतृत्वांशी बोलून तात्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले आहे.'

नवी दिल्ली: रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) मागील तेरा दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाचा संपूर्ण जगावर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) च्या बैठकीत या युद्धावर चर्चा झाली. तसेच, भारताने दोन्ही देशांना युद्ध थांबवण्याचे आवाहनदेखील केले.

15 लाख+ नागरिकांचे पलायनसंयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती (TS Tirumurti) म्हणाले की, युक्रेनमधील परिस्थिती सतत बिघडत आहे. मानवतावादी संकट अधिक गडद होत आहे. युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार, गेल्या अकरा दिवसांत 15 लाखांहून अधिक निर्वासितांनी युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये आश्रय घेतला आहे. युक्रेनमधील बिघडत चाललेली परिस्थिती आणि आगामी मानवतावादी संकटाकडे आपण तातडीने लक्ष द्यायला हवे, जेणेकरून परिस्थिती आणखी बिघडण्याआधीच हाताळता येईल, असे ते म्हणाले.

PMने केले युद्ध थांबवण्याचे आवाहनतिरुमूर्ती पुढे म्हणाले, यूएनच्या अंदाजानुसार, या युद्धात आतापर्यंत 140 हून अधिक नागरिक मारले गेले आहेत. यामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा समावेश आहे. ठार झालेल्या विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल भारत शोक करत आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. या संघर्षात प्रत्येक नागरिकाच्या मृत्यूबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो. आमचे पंतप्रधान पुन्हा एकदा दोन्ही बाजूंच्या नेतृत्वाशी बोलले आणि तात्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले. दोन्ही बाजूंनी पुन्हा संवादाच्या मार्गावर येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

20,000 हून अधिक भारतीय सुखरूप मायदेशी परतले

टीएस तिरुमूर्ती म्हणाले, आम्ही भारतीयांसह सर्व देशांतील नागरिकांसाठी सुरक्षित मार्गाच्या आमच्या तातडीच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. दोन्ही बाजूंकडून वारंवार आवाहन करुनही, सुमीमध्ये आमच्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्यात आलेला नाही. आम्ही इतर देशांतील नागरिकांनाही आपापल्या देशात परतण्यासाठी मदत केली आहे. एवढेच नाही तर आगामी काळातही असेच काम करण्याची आमची पूर्ण तयारी आहे.

भारताची युक्रेन आणि शेजारील देशांना मदत तिरुमूर्ती यांनी यावेळी सांगितले की, भारताने आधीच युक्रेन आणि त्याच्या शेजारी राष्ट्रांना मानवतावादी मदत पाठवली आहे. यामध्ये औषधे, तंबू, पाणी साठविण्याच्या टाक्या, इतर मदत साहित्याचा समावेश आहे. आम्ही इतर गरजा ओळखून पाठवण्याच्या प्रक्रियेत आहोत. भारतीयांना घरी आणण्यासाठी 80 हून अधिक उड्डाणे उडत आहेत. युक्रेन आणि त्याच्या शेजारी देशांच्या अधिकाऱ्यांनी आमच्या नागरिकांना परत आणण्यासाठी दिलेल्या मदतीची आम्ही प्रशंसा करतो.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाunited nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतprime ministerपंतप्रधान