शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

Russia-Ukraiane War: 'थेट सीमेवर जाऊ नका'; युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सरकारचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 19:05 IST

Russia-Ukraiane War: परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितल्यानुसार, आतापर्यंत 1396 विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यात आले आहे.

कीव: रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून भारत सरकार युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. युक्रेनमध्ये अडकलेले बहुतेक लोक विद्यार्थी आहेत. भारतीयांना परत आणण्यासाठी सरकार विशेष विमान पाठवत आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने आज युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी निर्देश जारी केले आहेत. "भारतीय विद्यार्थ्यी आणि इतर नागरिकांनी देशाच्या पश्चिम भागाकडे जाण्याचा प्रयत्न करावा, थेट सीमेवर पोहोचू नये," असे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

शेकडो भारतीय मादेशात परतलेपरराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ''युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांनी पोलंड, हंगेरी, स्लोव्हाकिया, रोमानिया आणि मोल्दोव्हा या शेजारील देशांमध्ये अधिकाऱ्यांशी समन्वय साधूनच सीमा ओलांडण्यासाठी जावे.'' रशियाने युक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाच्या पहिल्या अॅडव्हायझरीनंतर 8,000 हून अधिक भारतीयांनी युक्रेन सोडल्याचा अंदाज आहे. बागची यांनी सांगितल्यानुसार, ऑपरेशन गंगा अंतर्गत 6 फ्लाइट्सद्वारे आतापर्यंत 1,396 विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आले आहे.

फक्त युक्रेनची सीमा ओलांडावीबागची म्हणाले की, पुढील 24 तासांत आणखी तीन उड्डाणे पाठवण्याची योजना आहे. त्यापैकी दोन उड्डाणे बुखारेस्टहून दिल्ली आणि मुंबईसाठी तर एक उड्डाण बुडापेस्टहून दिल्लीसाठी असेल. परराष्ट्र मंत्रालयाने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना विमानांच्या उपलब्धतेबद्दल घाबरुन न जाण्याचे आवाहन केले आहे. बागची म्हणाले की, "उड्डाणे मर्यादित नाहीत, काळजी करण्याची गरज नाही. भारतीयांनी फक्त युक्रेनची सीमा सुरक्षितपणे ओलांडली पाहिजे, ही आमची मुख्य चिंता आहे."

लवकरात लवकर पश्चिमेकडे जावेबागची पुढे म्हणाले की, युक्रेनची राजधानी कीवमधून कर्फ्यू हटवण्यात आला आहे. त्यानंतर आता लोकांना जाण्याची परवानगी मिळाली आहे. भारतीयांनी लवकरात लवकर कीव रेल्वे स्थानकावर जावे आणि तेथून पश्चिम सीमेकडे जाण्यासाठी पकडावी. युक्रेन सरकारने कीव येथून मोफत ट्रेन सेवा सुरू केली आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाInternationalआंतरराष्ट्रीयStudentविद्यार्थी